Adani Electricity News : उन्हाच्या तडाख्यात वीज ग्राहकांना महागाईचा झटका; पुढील महिन्यांपासून होणार बिलात वाढ

Adani Power hikes tariff : पुढील महिन्यात परिस्थिती आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशातच ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका बसणार आहे. अदानी वीज कंपनीची वीज महागल्याने या ग्राहकांना वीजेच्या महागाईचा झटका बसणार आहे.
Adani Electricity News : उन्हाच्या तडाख्यात वीज ग्राहकांना महागाईचा झटका; पुढील महिन्यांपासून होणार बिलात वाढ
Electrical accidentsSaam tv

मुंबई : राज्यात उन्हाचा पारा वाढला आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे. पुढील महिन्यात परिस्थिती आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशातच ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका बसणार आहे. अदानी वीज कंपनीची वीज महागल्याने या ग्राहकांना वीजेच्या महागाईचा झटका बसणार आहे.

वीज बिलवाढीचा अदानी कंपनीच्या ३० लाख ग्राहकांना झटका बसणार आहे. निवासी ग्राहकांच्या इंधन अधिभारात प्रति युनिट ७० पैसे ते १.७० रुपये इतकी वाढ होणार आहे. मे महिन्यांपासून ही वाढ होणार आहे. इंधन खर्चातील वाढीमुळे ३१८ कोटी ३८ लाख रुपये वसूल करण्यासाठी अदानी कंपनीने राज्य वीज नियामक आयोगापुढे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर आयोगाकडून ही मंजुरी मिळाली.

Adani Electricity News : उन्हाच्या तडाख्यात वीज ग्राहकांना महागाईचा झटका; पुढील महिन्यांपासून होणार बिलात वाढ
Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, हल्लेखोरांकडून पनवेलच्या फार्महाऊसवर हल्ल्याचा कट, पुढे नेमकं काय झालं?

वीज दरवाढ कशी असणार ?

०-१०० वीज युनिट वापर - प्रति युनिट ७० पैसे

१०१-३०० युनिटसाठी १.१० रुपये

३०१-५०० युनिटसाठी १.५ रुपये

५०० हून अधिक युनिट वापर - १.७० रुपये इंधन अधिभार

Adani Electricity News : उन्हाच्या तडाख्यात वीज ग्राहकांना महागाईचा झटका; पुढील महिन्यांपासून होणार बिलात वाढ
Navi Mumbai Fire News : बेलापूरमधील झोपडपट्टीला भीषण आग, सिलिंडरचा स्फोटाने परिसर हादरला

दरम्यान, या वीज दरवाढीचा फटका मुंबईकरांना बसणार आहे. मे महिन्यांपासून ही दरवाढ होणार असल्याने मुंबईकरांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

महाराष्ट्रात सर्वात महागडी वीज

मीडिया रिपोर्टनुसार, देशातील दक्षिण राज्यांमध्ये काही महिन्यांपूर्वीच वीज दरवाढ करण्यात आली. त्यानंतर उत्तर भारतातील राज्यांमध्येही वीज दरवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. पण राज्यात ही वीजदरवाढ इतर राज्याच्या तुलनेत सर्वात महागडी वीज मिळत आहे. काही दिवसांपूर्वी आंध्रप्रदेश, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, गोवा, तेलंगणा, मध्य प्रदेशात वीज दरवाढ झाली. या राज्यांच्या तुलनेत राज्यातील वीजेचा दर जास्त असल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com