Huawei Matepad SE 11 Saam Tv
बिझनेस

Huawei Matepad SE 11 टॅबलेट लॉन्च; मिळणार 7700mAh ची दमदार बॅटरी, जाणून घ्या किंमत

Tablet News: Huawei ने जागतिक स्तरावर नवीन बजेट टॅबलेट Matepad SE 11 लॉन्च केला आहे. किफायतशीर असण्यासोबतच हा टॅबलेट मोठा डिस्प्ले, लॉन्ग बॅटरी लाइफ आणि इतर अनेक फिचर्ससह बाजारात सादर करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Huawei ने जागतिक स्तरावर नवीन बजेट टॅबलेट Matepad SE 11 लॉन्च केला आहे. किफायतशीर असण्यासोबतच हा टॅबलेट मोठा डिस्प्ले, लॉन्ग बॅटरी लाइफ आणि इतर अनेक फिचर्ससह बाजारात सादर करण्यात आला आहे. हा टॅबलेट दिसायला प्रीमियम आहे. याच्याच फीचर्स आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Huawei Matepas SE 11 स्पेसिफिकेशन

Huawei Matepad SE 11 मध्ये प्रीमियम लूकसाठी स्लिम आणि हलकी मेटल बॉडी आहे. तसेच हा टॅबलेट क्रिस्टल ब्लू आणि नेबुला ग्रे या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. याचे वजन 475 ग्रॅम आहे.

यात FHD+ रिझोल्यूशन (1920 x 1200 पिक्सेल) आणि 85 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह 11-इंच TFT LCD (IPS) पॅनेल डिस्प्ले देण्यात आला आहे. याच्या स्क्रीनमध्ये 400 nits पीक ब्राइटनेस, 1400:1 कॉन्ट्रास्ट रेशो, 16.7 मिलियन कलर्स, 100 टक्के sRGB कलर गॅमट आणि आरामदायी वाचनासाठी eBook मोड फीचर देण्यात आलं आहे.

Huawei ने आपल्या प्रोसेसरबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, Kirin 710A किंवा Snapdragon 680 चिपसेट यामध्ये मिळू शकतो. Huawei Matepad SE 11 मध्ये 64 GB किंवा 128 GB पर्याय मिळेल. तसेच यात 4 GB, 6 GB आणि 8 GB RAM पर्याय मिळेल.

कॅमेरा आणि बॅटरी

टॅबलेटमध्ये 8 मेगापिक्सेलची मागील लेन्स आहे. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 5-मेगापिक्सेल फ्रंट-फेसिंग कॅमेरासह बेसिक कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Huawei Matepad SE 11 टॅबलेटमध्ये 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. दरम्यान, याच्या किंमतीबद्दल अद्याप अधीकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghee Use For Hair: केसांना तूप लावण्याचे अद्भुत फायदे जाणून घ्या

Eggs Vs Paneer : प्रोटीनसाठी उत्तम काय?उकडलेले अंडे की पनीर? जाणून घ्या योग्य डाएटचा पर्याय

Mumbai Eastern Expressway: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी; आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Maharashtra Live News Update: मराठा नेते मनोज जरांगे आज पुण्यातल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर

ICICI Rules : आता बँक अकाउंटमध्ये ₹ ५०००० किमान बॅलेन्स ठेवावा लागणार, ICICI चा नवा नियम कुणाला होणार लागू?

SCROLL FOR NEXT