24GB RAM आणि 50MP कॅमेरा असलेल्या फोनवर मिळत आहे 23,000 रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

iQoo 11 5G: जर तुम्हाला प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि बंपर डिस्काउंटची वाट पाहत असाल, तर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर एक चांगली संधी मिळत आहे.
24GB RAM आणि 50MP कॅमेरा असलेल्या फोनवर मिळत आहे 23,000 रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर
iQoo 11 5GSaam Tv

Amazon Sale:

जर तुम्हाला प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि बंपर डिस्काउंटची वाट पाहत असाल, तर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर एक चांगली संधी मिळत आहे. ही खास डील iQOO 11 5G वर उपलब्ध आहे, जी व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह 24GB रॅम देते आणि या फोनमध्ये प्रीमियम कॅमेरा सेटअप आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळेल.

iQOO आपल्या स्मार्टफोनवर मोठी सूट देत आहे. ही सूट मिळत आहे iQoo 11 5G च्या 16GB इन्स्टॉल रॅम व्हेरिएंटवर. यात Extended RAM 3.0 फीचर्ससह अतिरिक्त 8GB व्हर्चुअल रॅम उपलब्ध आहे. अशाप्रकारे फोनमध्ये एकूण 24GB रॅम उपलब्ध आहे आणि 120W फ्लॅश चार्जचा सपोर्ट देखील या डिव्हाइसचा एक भाग आहे.

24GB RAM आणि 50MP कॅमेरा असलेल्या फोनवर मिळत आहे 23,000 रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर
Vivo First Folding Smartphone: Vivo कंपनीचे मोठे पाऊल; भारतात लवकरच लाँच करणार पहिला फोल्डिंग स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स

गेल्या वर्षी iQoo 11 5G च्या 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत लॉन्चच्या वेळी 64,999 रुपये होती.हा फोन आता ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर 44,999 रुपयांच्या सवलतीत लिस्ट करण्यात आलाआहे. याशिवाय HDFC बँक कार्ड, ICICI बँक डेबिट कार्ड किंवा Amazon Pay, ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास यावर 3000 रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. यानंतर याची किंमत फक्त 41,999 रुपये राहील.

जर ग्राहकांना त्यांचा जुना फोन एक्सचेंज करायचा असेल तर त्यांना 41,650 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मात्र तुमच्या जुन्या फोनचे मॉडेल आणि स्थिती यावर ही सूट अवलंबून आहे. हा फोन Legend आणि Alpha या दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

24GB RAM आणि 50MP कॅमेरा असलेल्या फोनवर मिळत आहे 23,000 रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर
Hyundai च्या या कार्समध्ये मिळतं CNG इंजिन, 27 किमीचा देतात मायलेज; पाहा लिस्ट

iQoo 11 5G स्पेसिफिकेशन

iQoo च्या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले आहे. जो 144Hz रिफ्रेश रेटसह येतो आणि 1800nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. गोरिला ग्लास व्हिक्टसच्या सेफ्टी व्यतिरिक्त, या फोनमध्ये V2 डिस्प्ले चिप आहे. फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह येतो.

फोनच्या मागील पॅनलवर 50MP+13MP+8MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि समोर 16MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. iQoo 11 5G मध्ये 120W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी ग्राहकांना मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com