Vivo First Folding Smartphone: Vivo कंपनीचे मोठे पाऊल; भारतात लवकरच लाँच करणार पहिला फोल्डिंग स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स

Vivo X Fold 3 Pro : विवो ही भारतातील प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. कंपनी आता भारतात लवकच फोल्डिंग फोन लाँच करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Vivo First Folding Smartphone
Vivo First Folding SmartphoneGoogle

विवो ही भारतातील प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन फोन लाँच करत असते. कंपनीच्या फोनमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात येतात. कंपनी आता भारतात लवकच फोल्डिंग फोन लाँच करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीने मार्च महिन्यात चीनमध्ये Vivo X Fold 3 Pro स्मार्टफोन लाँच केला होता. त्यानंतर आता भारतात हा फोन लाँच होणार आहे. कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, विवो कंपनी पुढच्या महिन्यात भारतात पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करु शकते. Vivo X Fold 3 Pro मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 8.03 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेस रेटला सपोर्ट करतो.

चीनमध्ये लाँच केलेल्या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. स्मार्टफोनमध्ये 16GB रॅम आणि 1TB स्टोरेजचा पर्याय देण्यात येईल. जून महिन्याच्या सुरुवातील हा स्मार्टफोन भारतात लाँच होऊ शकतो. हा स्मार्टफोन सॅंमसंग आणि वन प्लसच्या फोल्डेबल फोनशी स्पर्धा करेन असे सांगण्यात येत आहे.

Vivo First Folding Smartphone
Share Market News: निवडणुकीच्या धामधुमीत शेअर बाजारात उलथापालथ; सेन्सेक्समध्ये ७०० अंकांनी घसरण, टाटाचे शेअर्सही गडगडले

फीचर्स

Vivo X Fold 3 Pro स्मार्टफोन Android 14 वर आधारित असून Origin OS सह लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा कव्हर डिस्प्ले आहे. जो AMOLED पॅनेलसह येतो. या स्मार्टफोनमध्ये Vivo V3 चिप देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये 5700 mAh बॅटरी दिली आहे. कंपनी हा फोन भारतात याच फीचर्ससह लाँच करेन किंवा त्यात काही बदल करणार आहेत याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Vivo First Folding Smartphone
Gold Silver Price Fall : खुशखबर! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा तुमच्या शहरातील कमी झालेल्या किंमती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com