Infinix Note 40 Series Racing Edition लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Infinix Note 40 Series Racing Edition: स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने आपल्या Note 40 सीरीजचे Racing Edition फोन लॉन्च केले आहेत.
Infinix Note 40 Series Racing Edition लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Infinix Note 40 Series Racing EditionSaam tv

स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने आपल्या Note 40 सीरीजचे Racing Edition फोन लॉन्च केले आहेत. ज्या अंतर्गत कंपनीने 5 स्मार्टफोन नवीन स्टाईलमध्ये सादर केले आहेत. ज्यात Infinix Note 40, Note 40 5G, Note 40 Pro, Note 40 Pro 5G आणि Note 40 Pro + 5G चा समावेश आहे.

या लेटेस्ट फोन्सच्या डिझाईनबद्दल सांगायचे तर, हे BMW ग्रुप Designworks च्या सहकार्याने तयार केले गेले आहे. या फोनमध्ये डिझाईन व्यतिरिक्त इतर कोणतेही बदल दिसणार नाहीत. याचे स्पेसिफिकेशन याच्या स्टँडर्ड व्हर्जन सारखेच आहेत. हा फोन जागतिक स्तरावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. यातच आपण या फोनची किंमत आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

Infinix Note 40 Series Racing Edition लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Vivo चा सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन X Fold 3 Pro लॉन्च, जाणून घ्या किंमत

किती आहे किंमत?

Infinix Note 40 Racing Edition ची प्रारंभिक किंमत 209 डॉलर्स आहे (भारतीय चलनात 17,453 रुपये). Infinix Note 40 5G रेसिंग एडिशनची प्रारंभिक किंमत 259 डॉलर्स (सुमारे 21,629 रुपये) ठेवण्यात आली आहे. Infinix Note 40 Pro Racing Edition ची प्रारंभिक किंमत 279 डॉलर्स (सुमारे 23,299 रुपये) आहे.

Infinix Note 40 Pro 5G रेसिंग एडिशन ची किंमत 309 डॉलर्स (सुमारे 25,804 रुपये) आहे. तर याच्याटॉप मॉडेल Infinix Note 40 Pro Plus 5G Racing Edition ची प्रारंभिक किंमत 329 डॉलर्स (सुमारे 27,474 रुपये) आहे.

Infinix Note 40 Series Racing Edition लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
5,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा! नवीन Realme C63 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत

Infinix ने Note 40, Note 40 5G, Note 40 Pro, Note 40 Pro 5G आणि Note 40 Pro+ 5G रेसिंग एडिशन अंतर्गत लॉन्च केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे डिझाइन अॅडव्हान्स यूव्ही ट्रान्सफर प्रिंटिंग प्रक्रियेचा वापर करून तयार करण्यात आले आहेत.

रेसिंग एडिशन सिरीजचे सर्व फोन ग्लॉसी फिनिशसह सिल्व्हर कलर ऑप्शनमध्ये येत आहेत. त्याच्या मागील कॅमेरा मॉड्यूलवर ट्राय-कलर देखील आहे. हे नवीन मॉडेल्स बीएमडब्ल्यू ग्रुप डिझाइनवर्क्सच्या सहकार्याने डेव्हलप करण्यात आले आहेत. या फोनच्या मागील पॅनलवर स्लिम स्ट्रिप लाइन देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com