Vivo चा सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन X Fold 3 Pro लॉन्च, जाणून घ्या किंमत

Cheapest Foldable Smartphone: आगाडीची मोबाइल उत्पादक कंपनी Vivo ने आपला पहिला फोल्डेबल फोन Vivo X Fold 3 Pro भारतात लॉन्च केला आहे.
Vivo चा सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन X Fold 3 Pro लॉन्च, जाणून घ्या किंमत
Vivo X Fold 3 ProSaam Tv

Vivo ने आपला पहिला फोल्डेबल फोन Vivo X Fold 3 Pro भारतात लॉन्च केला आहे. हा फोन लॉन्च झाल्यानंतर भारतातील सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन स्वस्त झाला आहे. हा फोन Amazon वर 20,000 रुपयांनी स्वस्तात उपलब्ध आहे.

या फोल्डमध्ये 7.8 इंच फोल्ड करण्यायोग्य स्क्रीन आहे. फोनच्या मागील बाजूस दोन 50MP कॅमेरे आहेत. यातच आम्ही तुम्हाला Tecno Phantom V Fold स्मार्टफोनबद्दल बोलत माहिती सांगणार आहोत. हा फोन 20,889 रुपयांच्या डिस्काउंटवर विकला जात आहे. Tecno Phantom V Fold वर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटबद्दलही माहिती जाणून घेऊ...

Vivo चा सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन X Fold 3 Pro लॉन्च, जाणून घ्या किंमत
5,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा! नवीन Realme C63 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत

Tecno Phantom V Fold 5G

Tecno Phantom V Fold 5G भारतात 88,888 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे, जो 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या एकाच प्रकारात येतो. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि व्हाईट रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन Amazon वर 20,889 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 72,999 रुपयांना विकला जात आहे.

कंपनी या फोनवर दोन वर्षांची वॉरंटी, सहा महिन्यांपर्यंत मोफत पिक अँड ड्रॉपसह एक वेळ स्क्रीन रिप्लेसमेंटची ऑफर देत आहे. यासोबतच HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना 250 रुपये अतिरिक्त डिस्काउंट मिळेल.

Vivo चा सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन X Fold 3 Pro लॉन्च, जाणून घ्या किंमत
50MP कॅमेरा अन् 12GB रॅमसह Nothing Phone 2a Special Edition लाँच; जाणून घ्या किंमत

Tecno Phantom V Fold स्पेसिफिकेशन

Tecno Phantom V Fold मध्ये 2296x200 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 7.8-इंच 2K LTPO AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये 1080x2550 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.42-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 9000+ चिपसेट आणि 12GB RAM यात ग्राहकांना मिळेल. फोल्ड करण्यायोग्य Tecno स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: 256GB आणि 512GB.

या ड्युअल-सिम फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश असून यात ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये f/1.8 अपर्चरसह 50MP प्रायमरी सेन्सर, f/2.2 अपर्चरसह 13MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 50MP कॅमेरा आहे. याच्या बाहेरील डिस्प्लेवर 32MP सेल्फी कॅमेरा असून आतील बागेत फ्रंट कॅमेरा 16MP चा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com