HSRP Number Plate Saam Tv
बिझनेस

HSRP Number Plate: उरले फक्त २४ तास! HSRP नंबरप्लेट बसवा अन्यथा भरावे लागणार १०,००० रुपये; ऑनलाइन प्रोसेस वाचा सविस्तर

HSRP Number Plate Registration Process: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही अजूनही नंबरप्लेटसाठी रजिस्ट्रेशन केले नसेल तर लवकर करा. अन्यथा दंड भरावा लागणार आहे.

Siddhi Hande

एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट

उद्यापर्यंत तुम्ही नंबरप्लेटसाठी रजिस्ट्रेशन करा अन्यथा भरावा लागणार दंड

एचएसआरपी नंबरप्लेटसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रोसेस

राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट लावणे अनिवार्य आहे. दरम्यान, २०१९ नंतरच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट लावल्या आहेत. त्याआधीच्या सर्व वाहनांना नंबर प्लेट लावणे अनिवार्य केले आहे. यासाठीची शेवटची तारीख उद्या म्हणजे १५ ऑगस्टची आहे. तुमच्याकडे फक्त २४ तास उरले आहेत त्यामुळे तुम्ही लवकरच एचएसआरपी नंबरप्लेटसाठी रजिस्ट्रेशन करा.

२४ तासांत नंबरप्लेट बसवा अन्यथा भरावा लागणार दंड (HSRP Number Plate)

एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही ही नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागणार आहे. उद्यापासून ज्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट नसेल त्यांच्याकडून दंड वसूल केले जाणार आहे. दरम्यान, तुमच्याकडे अजून १ दिवस आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावे.

एचएसआरपी नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन कसं करावं? (HSRP Number Plate Registration Online Process)

  • तुम्हाला सर्वात आधी transport.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

  • यानंतर Apply High Security Registration Plate Online या ऑप्शनवर क्लिक करा.

  • यानंतर तुम्हाला Order HSRP असं टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर, इंजिन नंबर टाकायचा आहे. याचसोबत मोबाईल नंबरदेखील टाका.

  • यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्यात येईल. तुम्हाला तुमच्या वाहनानुसार शुल्क भरायचे आहे.

  • त्यानंतर तुम्हाला रिसिप्ट मिळणार आहे. तुमची तुमच्या जवळच्या एजन्सीत अपॉइंटमेंट बुक होणार आहे.

  • त्यानंतर दिलेल्या तारखेला तुम्हाला एजन्सीत जाऊन नंबरप्लेट बदलून घ्यायची आहे.

जर तुम्ही १५ ऑगस्टपूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला दंड भरावा लागणार नाहीये.त्यामुळे लगेच अप्लाय करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banarasi Kurta Design: लग्नसराई ते डेली वेअरसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट बनारसी कुर्ते

World Cup 2026 final : फायनलआधी टीम इंडियाचा मोठा निर्णय, २०२३ च्या कटू आठवणीमुळे बदल?

Success Story: आई-बाप फक्त दहावी पास, पण लेकीला सरकारी अधिकारी केलं; मालेगावच्या प्रेरणाची UPSCत भरारी, वाचा सक्सेस स्टोरी

DCM Plane News : उपमुख्यमंत्री मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, केबिनमध्ये धुराचे लोट अन्...

Silver Rate: तीन दिवसात तीस हजारांनी चांदी स्वस्त, लग्नसराईआधी ग्राहकांना दिलासा, वाचा ताजे दर

SCROLL FOR NEXT