HSRP Plate : लाखो वाहनधारकांना दिलासा मिळणार, HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढणार?

HSRP Number Plate Deadline May Extended: एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. ही तारीख कदाचित वाढवली जाऊ शकते.
HSRP Plate
HSRP PlateSaam Tv
Published On

एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना आता HSRP नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. २०१९ नंतरच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवली आहे. परंतु त्याआधीच्या वाहनांना बसवावी लागणार आहे.आता एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ केली जाऊ शकते.

HSRP Plate
Mumbai News : वाहनधारकांनो सावधान! नंबर प्लेटमध्ये फेरफार केल्यास फटका बसणार! जाणून घ्या HSRP संबंधित नियम

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट(High Security Registration Number Plate) अनेक लोकांनी बसवली आहे. मुंबईत (MMR Mumbai Metropolitan Region)१० लाख वाहनधारकांनी ही नंबरप्लेट बसवली आहे. अजूनही अनेक वाहनांना नंबर प्लेट बसवणे बाकी आहे. त्यामुळे कदाचित मुदतवाढ होऊ शकते. दरम्यान, एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी अनेक तक्रारी आल्या आहेत. डायरेक्ट पेमेंटसंदर्भात काही तक्रारी आहेत. सर्व पेमेंट हे तुम्हाला बुकींग करतानाच करायचे असतात.

परिवहन विभागाने एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख ३० जून निश्चित केली आहे. परंतु तोपर्यंत कदाचित सर्व वाहनांना नंबर प्लेट बसवली जाणार नाही. त्यामुळे ही मुदतवाढ केली जाऊ शकते.

मुंबईतील नागरिकांना एचएसआरपी नंबरप्लेट (HSRP Number Plate)बसवण्यासाठी तीन एजन्सी काम करत आहे. वेगवेगळ्या विभागात या एजन्सी असतील.येथे जाऊन तुम्ही एचएसआरपी नंबरप्लेट बसवू शकतात.

जर तुम्हाला कोणतीही तक्रार करायची असेल तर ०२२ २०८२६४९८ नंबरवर कॉल करु शकतात. याचसोबत hsrpcomplaint.tco@gmail.com वर तक्रार करु शकतात.

HSRP Plate
HSRP Plate: वाहनधारकांना दिलासा! HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत करू शकता काम

२ कोटी वाहने

जवळपास २ कोटी वाहने ही २०१९ पूर्वीची आहेत. यापैकी फक्त काहीच जणांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवली आहे, असं आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामळेच कदाचित मुदतवाढ दिली जाऊ शकते.

HSRP Plate
HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com