HSRP Plate: वाहनधारकांना दिलासा! HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत करू शकता काम

HSRP Plate Registration Deadline Extended: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
HSRP Plate
HSRP PlateSaam Tv
Published On

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता प्रत्येक वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. आता यासाठीची मुदतवाढ वाढवून देण्यात आली आहे. आता वाहनधारक ३० जून २०२५ पर्यंत वाहनांना HSRP नंबरप्लेट लावू शकतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे अनिवार्य केले आहे. याबाबत राज्य सरकारने परिपत्रक जारी केले होते. (HSRP Plate Registration Deadline Increase)

HSRP Plate
Tax Saving Schemes: टॅक्स वाचवायचाय? या १० सरकारी योजनांना ठरतील फायद्याच्या, कर तर वाचेलच सोबत मिळेल जबरदस्त परतावा

दरम्यान आता वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) वाहनावर लावण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आता 30 जून पर्यंत जुन्या वाहनांना बसवता येणार HSRP प्लेट्स बसवू शकतात.

राज्यातील 2019 पूर्वीच्या वाहनांना ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवावी लागणार आहे. २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांना आधीच HSRP नंबर प्लेट बसवण्यात आली आहे.

यापूर्वी 31 मार्च 2025 पर्यंत वाहनांना नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत वाढवून 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र राज्यातील एकूण वाहनांचे संख्या पाहता या नव्या नंबर प्लेट खूप कमी प्रमाणात बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळेच 30 जून 2025 पर्यंत एचएसआरपी प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी जारी केले आहे.

HSRP Plate
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना! महिन्याला ५००० गुंतवा अन् ८ लाख मिळवा; वाचा कॅलक्युलेशन

HSRP नंबर प्लेट कशी बसवायची?

HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला https://transport.maharashtra.gov.in/1035/Home यावर भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.यानंतर फिटमेंट सेंटरवर अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला अधिकृत विक्रेत्यांकडून एचएसआरपी नंबर प्लेट बसवावी लागणार आहे.

HSRP Plate
HSRP Plate: कार रजिस्ट्रेशन एका शहरात अन् राहायला दुसऱ्या शहरात? HRSP नंबरप्लेटबाबत फडणवीस सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com