कामाची बातमी! सर्व गाड्यांना एचएसआरपी नंबरप्लेट बंधनकारक, अन्यथा दंडात्मक कारवाई

HSRP Registration : आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. अन्यथा ३१ मार्चनंतर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
HSRP Registration
HSRP Registration Saam Tv
Published On

मनोज जैयस्वाल,साम प्रतिनिधी

High Security Registration Plate : वाहनांवरील नंबरप्लेटमध्ये छेडछाड, बनावट नंबरप्लेट प्रकारांना आळा घालण्यासाठी आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे बंधनकारण करण्यात आले आहे. ज्यांच्या गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट म्हणजेच एचएसआरपी (HSRP) नंबरप्लेट नसेल त्यांना ३१ मार्चनंतर (HSRP Plates to Become Compulsory for All Vehicles) दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. असे पत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने काढले आहे. त्यामुळे लवकरात लवकर HSRP नंबरप्लेट लावून घेण्यात यावी.

सरकारने का घेतला एचएसआरपी नंबरप्लेटचा निर्णय?

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० अन्वये शासनाकडून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे. वाहनांना नंबरप्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणा-या वाहनांची ओळख पटविणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

एचएसआरपी नंबरप्लेट कशी बुकिंग कराल? Apply High Security Registration Plate

नंबरप्लेटच्या बुकिंगसाठी https://mhhsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉईंटमेंट घेऊन नंबरप्लेट बसवून घ्यावी, असे अवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

नंबरप्लेट न बसविल्यास दंडात्मक कारवाई - Vehicles Without HSRP Number Plates to Face Penalty After March 31

नागरिकांनी वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट न बसविल्यास वाहनांचे मालकी हक्क हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम प्रत, विमा अद्ययावत करणे आदी कामकाज थांबविण्यात येईल. एचएसआरपी नंबरप्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबरप्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर भविष्यात दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा परिवहन अधिकारी यांनी दिला आहे.

किती लागतील पैसे?

१ ) दुचाकी आणि ट्रॅक्टर...४५० रुपये... यात GST वेगळी लागेल.

२) तीनचाकी :- ५०० रुपये..GST वेगळी लागेल...

३) हलकी मोटार वाहने, प्रवासी कार,मध्यम व्यावसायिक वाहने,अवजड व्यावसायिक वाहने आणि ट्रेलर :- ७४५ रुपये...GST वेगळी लागेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com