Emergency Landing : ५००० फूटावर विमानाचं इंजिन बिघडलं; बोईंग ड्रीमलाइनरचं इमर्जन्सी लँडिग, नेमकं काय घडलं?

plane Emergency Landing : विमानाचं इंजिन ५००० फूटावर असताना बिघडलं. बोईंग ड्रीमलाइनरचं इंजिन बिघडल्यानंतर इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं.
plane Emergency Landing
Emergency Landing Saam tv
Published On
Summary

विमानाचं इंजिन ५००० फूट उंचीवर असताना बिघडलं.

पायलटने 'Mayday' कॉल दिला.

विमानाने २ तास ३८ मिनिटे आकाशात घिरट्या मारून इंधन कमी केलं.

पायलटने सुरक्षितपणे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

एका विमानाची मोठी दुर्घटना टळली. यूनायटेड एअरलाइन्सच्या विमानाने म्यूनिखसाठी उड्डाण घेतलं होतं. बोइंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान होतं. वॉशिंग्टनसाठी उड्डाण घेतल्यानंतर विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यानंतर पायलने 'मेडे' अलर्ट जारी केला. विमान ५००० हजार फुटावर असताना इंजिनमध्ये बिघाड झाला.

UA108 क्रमांकांच्या विमानाने २५ जुलै वॉशिंग्टनने उड्डाण घेतलं. विमान ५ हजार उंचीवर होतं. त्याचवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला. यानंतर पायलटने MAYDAY कॉलची घोषणा केली. या घटनेची तातडीने माहिती कंट्रोल रुमला दिली. त्यानंतर विमानाचं सुरक्षितपणे लँडिग करण्यात आलं.

plane Emergency Landing
Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

रिपोर्टनुसार, युनायटेड एअरलाइन्सचं विमानाच्या पायलटने 'मेडे' अलर्ट जारी केले. 'मेडे' अलर्ट जारी केल्यानंतर विमान २ तास ३८ मिनिट हवेत होतं. विमानाचं इंधन कमी करण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये आकाशात घिरट्या माराव्या लागल्या. यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं.

plane Emergency Landing
Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

दरम्यान, यूनायडेट ड्रीमलाइनरच्या इंजिन बिघाड झाल्यानंतर अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना घडली होती. उड्डानानंतर काही मिनिटात इंजिनमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर झालेल्या दुर्घटनेत २६० लोकांचा मृत्यू झाला होता. अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली होती.

Q

बोईंग ड्रीमलाइनर विमानाचं इंजिन कधी बिघडलं?

A

युनायटेड एअरलाइन्सच्या UA108 विमानाचं इंजिन ५००० फूट उंचीवर असताना बिघडलं.

Q

पायलटने काय म्हटलं?

A

पायलटने 'Mayday' अलर्ट जारी केला. त्यानंतर कंट्रोल रूमला माहिती दिली.

Q

विमानाचं लँडिंग कसं झालं?

A

विमानाचं इंधन कमी करण्यासाठी आकाशात २ तास ३८ मिनिटे घिरट्या मारल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com