Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

maharashtra Political News : शरद पवारांना कोल्हापुरातून मोठा राजकीय धक्का बसणार आहे. कोल्हापुरातील नेते समरजीत घाटगे यांचा भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त जवळपास निश्चित झाला आहे.
sharad pawar news
sharad pawar Saam tv
Published On
Summary

शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

घाटगे यांचा भाजप प्रवेश ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सहकार क्षेत्रातील अनुभवामुळे घाटगे यांचा प्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणुकीत उतरलेले समरजीत घाटगे आता पुन्हा महायुतीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

kolhapur News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आधीच शरद पवारांना मोठा धक्का बसणार आहे. कागलमधील शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती हाती आली आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील या आठवड्यात कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापुरातील या दौऱ्यादरम्यान घाटगे यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरणार आहे. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून हसन मुश्रीफ यांनी निवडणूक लढली होती. तर त्यांच्याविरोधात भाजपमधून शरद पवार गटात आलेले समजीत घाटगे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, पराभवानंतर समरजीत घाटगे यांना स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान घाटगे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.

sharad pawar news
Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

समरजीत घाटगे यांचं सहकार क्षेत्रात मोठं नाव आहे. घाटगे यांचं शाहू कारखाना, शाहू दूध, शिक्षण संस्था, बँकिग क्षेत्रात देखील त्यांचं मोठं योगदान आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात सहकारी संस्था सांभाळणे आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे सरकारच्या बाजूने भूमिका घेणे हिताचे असते, असा अनुभव त्यांनी मागील काही दिवसांत सांगितला.

sharad pawar news
Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत समरजीत घाटगे यांचा हसन मुश्रीफ यांनी पराभव केला होता. घाटगे यांना मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा ४५ हजार अधिक मते मिळाली. दुसरीकडे माजी खासदार संजय मंडलिक यांची साथ आणि लाडकी बहीण योजनेमुळे हसन मुश्रीफ यांना अधिक मते मिळाली. हसन मुश्रीफ फक्त ११ हजार मतांनी विजयी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com