Reset and Unlock Android and iPhone Passwords at Home Using Google, or Smart Lock Features  
बिझनेस

Phone Unlock Tricks: फोनचा पासवर्ड विसरलात? दुकानात न जाता फोन उघडण्यासाठी वापरा 'हे' ट्रिक्स, फोन होईल अनलॉक

Password Reset Tips: फोनचा पासवर्ड विसरल्यानंतर लगेच दुकानात जाण्याची गरज नाही. काही सोप्या युक्त्या वापरून तुम्ही तुमचा लॉक केलेला फोन स्वतः सुरक्षितपणे उघडू शकता.

Dhanshri Shintre

  • जुना किंवा विसरलेला पासवर्ड घरबसल्या रीसेट करता येतो.

  • गुगल फाईंड माय डिव्हाइस आणि iTunes वापरून पासवर्ड रीसेट शक्य आहे.

  • फॅक्टरी रीसेट हा अंतिम पर्याय आहे, ज्यामध्ये सर्व डेटा हटतो.

  • स्मार्ट लॉक फीचर वापरून भविष्यात पासवर्ड विसरल्यासही फोन सहज अनलॉक होतो.

बर्‍याच वेळा आपल्याला जुना मोबाईल पासवर्ड आठवत नसल्यामुळे समस्या निर्माण होते. अनेकजण पासवर्ड बदलल्यानंतर जुन्या पासवर्डचा वापर करत राहतात, ज्यामुळे फोन अनलॉक होत नाही. अशा परिस्थितीत काही लोक फोन स्टोअर किंवा दुकानात जाऊन पासवर्ड क्रॅक करून घेतात, पण यासाठी पैसे द्यावे लागतात. मात्र, घरबसल्याही पासवर्ड बदलणे शक्य आहे.

जर तुमचा अँड्रॉइड फोन व्हर्जन ४.४ किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर ५-६ वेळा चुकीचा पासवर्ड किंवा पॅटर्न टाकल्यावर स्क्रीनवर 'फॉरगॉट पॅटर्न' किंवा पासवर्ड रीसेट करण्याचा पर्याय दिसतो. यानंतर गुगल अकाउंटची माहिती भरण्यासाठी विचारले जाते आणि पासवर्ड रीसेट करता येतो.

जर फोन तुमच्या गुगल अकाउंटशी लिंक असेल, तर दुसऱ्या डिव्हाइसवरून findmydevice.google.com वर लॉगिन करून लॉक केलेले डिव्हाइस निवडून नवीन पासवर्ड सेट करता येतो. हा पासवर्ड वापरून फोन अनलॉक करता येतो. जर वरील पद्धतींनीही फोन उघडत नसेल, तर फॅक्टरी रीसेट हा शेवटचा उपाय राहतो. यासाठी फोन बंद करून पॉवर आणि व्हॉल्यूम डाउन बटण एकत्र दाबून रिकव्हरी मोडमध्ये जाणे आवश्यक आहे.

मेनूमध्ये 'Wipe Data/Factory Reset' निवडल्यावर फोन रीस्टार्ट होईल आणि पासवर्ड काढून टाकला जाईल. मात्र, या प्रक्रियेत सर्व डेटा हटवला जातो. आयफोन यूजर्ससाठी फोन संगणकाशी कनेक्ट करून iTunes किंवा Finder वापरून रिकव्हरी मोडमध्ये 'Restore iPhone' हा पर्याय निवडावा लागतो, ज्यामुळे पासवर्ड काढला जातो, पण डेटा बॅकअप नसल्यास सर्व माहिती मिटवली जाते.

अँड्रॉइड यूजर्स स्मार्ट लॉक फीचरचा वापर करून भविष्यकाळात पासवर्ड विसरल्यासही फोन सहज अनलॉक करू शकतात. स्मार्ट लॉकमध्ये ट्रस्टेड लोकेशन, डिव्हाइस किंवा फेस रेकग्निशन सेट करून, फोन आपोआप अनलॉक होतो. महत्त्वाची बाब म्हणजे स्मार्ट लॉक आधीच सेटअप केलेले असावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

Nanded Accident : गणेश भक्तांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

Mumbai Konkan Ro Ro Ferry : तळकोकणात पोचा अवघ्या पाच तासात; आता मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा, VIDEO

Numerology: सप्टेंबर महिना 'या' मूलांकासाठी ठरेल लकी, स्वप्न होतील पूर्ण

Netflix Trending Films: नेटफ्लिक्सवर ट्रेंड होताहेत 'हे' सुपरहिट चित्रपट; भारतीय सिनेमाचांही समावेश, वाचा यादी

SCROLL FOR NEXT