Dhanshri Shintre
जिओ आपल्या ग्राहकांसाठी विविध रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देते. त्यापैकी काही खास प्लॅन लोकप्रिय आहेत. आज आपण अशाच एका आकर्षक प्लॅनची माहिती जाणून घेऊ.
आज आपण जिओच्या विशेष ₹100 प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त ₹100 मध्ये तब्बल ₹299 चा फायदा मिळतो.
जिओने या खास प्लॅनला JioHotstar डेटा पॅक असे नाव दिले आहे. या प्लॅनसोबत ग्राहकांना JioHotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन मोफत मिळते.
या जिओ प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 5GB डेटा दिला जातो. त्यासोबतच 90 दिवसांसाठी जिओहॉटस्टारचा मोफत अॅक्सेस मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.
या प्लॅनमध्ये मिळणारे JioHotstar सबस्क्रिप्शन मोबाईल तसेच टीव्हीवर वापरता येते. या पॅकमध्ये केवळ डेटा आणि ओटीटी फायदेच समाविष्ट आहेत, कॉलिंग सुविधा नाही.
हा जिओ प्लॅन सक्रिय करण्यासाठी तुमच्याकडे अॅक्टिव्ह बेस प्लॅन असणे गरजेचे आहे. याशिवाय काही महत्त्वाच्या अटी ग्राहकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
जर तुम्ही मासिक रिचार्ज वापरत असाल, तर तो संपल्यानंतर ४८ तासांच्या आत पुन्हा रिचार्ज करणे आवश्यक आहे, जेणेकरून JioHotstar अॅक्सेस सतत मिळेल.
जर तुम्ही लाँग-व्हॅलिडिटी प्लॅन घेतला असेल, तर पुढील ९० दिवसांसाठी JioHotstar चे सबस्क्रिप्शन सतत उपलब्ध राहील.
JioHotstar चा टीव्ही प्लॅन २९९ रुपयांत उपलब्ध असून, तो तीन महिन्यांची वैधता देतो. मात्र, हा अॅक्सेस फक्त एका डिव्हाइसवरच वापरता येईल.