Dhanshri Shintre
स्मार्टफोन वापरताना अनेक वेळा कॉलशी संबंधित अडचणी येतात, जसे कॉल ड्रॉप होणे, आवाज स्पष्ट न येणे, नेटवर्क समस्या.
कॉलिंगदरम्यान समस्या जसे नेटवर्क कट होणे, आवाज खंडित येणे किंवा कॉल न लागणे, अशा अडचणी तुम्हालाही येतात का?
कॉलिंगच्या अडचणी दूर करण्यासाठी काही सोपे आणि उपयुक्त उपाय उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन वापर अधिक सुरळीत होईल.
जर फोन कॉलमध्ये अडचणी येत असतील, तर सर्वप्रथम तुमचे नेटवर्क सिग्नल व्यवस्थित आहेत का हे तपासणे गरजेचे आहे.
कॉलिंगमध्ये अडचण येत असल्यास, सर्वप्रथम मोबाईलवरील फ्लाइट मोड सक्रिय आहे की बंद हे तपासणे आवश्यक आहे.
अँड्रॉइड फोनवर डू नॉट डिस्टर्ब मोड चालू असल्यास, इनकमिंग कॉल आपोआप ब्लॉक होतात आणि तुम्हाला कॉल मिळत नाहीत.
कॉलिंग समस्या दूर करण्यासाठी फोनच्या नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा, यामुळे सिग्नलमध्ये सुधारणा होऊन कॉल व्यवस्थित जोडले जातील.
कॉलिंगशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी फोन रिसेट करणे हा एक प्रभावी उपाय आहे, ज्यामुळे नेटवर्क आणि सिस्टीम सेटिंग्ज नीट होतात.