Pixel 10 Series Sale: गुगल पिक्सेल १० सिरीजची विक्री सुरू; मिळणार १० हजार रुपयांची सूट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Smartphone Sale: गुगलने पिक्सेल १० मालिकेत चार नवे स्मार्टफोन सादर केले आहेत. २८ ऑगस्टपासून उपलब्ध हे फोन टेन्सर जी५ प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमेरा आणि आकर्षक फीचर्ससह येतात.
गुगल पिक्सेल १० सिरीजची विक्री सुरू, आकर्षक ऑफर्ससह मिळणार जबरदस्त फीचर्स
GOOGLE PIXEL 10 SERIES SALE STARTS WITH BIG CASHBACK OFFERS
Published On
Summary
  • गुगल पिक्सेल १० सिरीजची विक्री २८ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.

  • पिक्सेल १० प्रो आणि प्रो एक्सएलवर १०,००० रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

  • हे हँडसेट फ्लिपकार्ट, क्रोमा, विजय सेल्स आणि गुगल स्टोअरवर उपलब्ध आहेत.

  • सर्व मॉडेल्स अँड्रॉइड १६ आणि टेन्सर G5 प्रोसेसरसह येतात.

गुगलने आपल्या नवीन पिक्सेल १० सिरीजची विक्री आजपासून म्हणजेच २८ ऑगस्टपासून सुरू केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने पिक्सेल १०, पिक्सेल १० प्रो, पिक्सेल १० प्रो एक्सएल आणि पिक्सेल १० प्रो फोल्ड हे चार स्मार्टफोन लाँच केले होते. या सिरीजमध्ये विशेष म्हणजे, पिक्सेल १० मॉडेलमध्ये सर्वाधिक बदल करण्यात आले असून आता यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, मोठी बॅटरी आणि नवीन प्रोसेसर देण्यात आला आहे.

गुगल पिक्सेल फोनची किंमत किती?

गुगल पिक्सेल १० ची सुरुवातीची किंमत ७९,९९९ रुपये असून तो १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज या एकाच कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. या फोनवर एचडीएफसी बँक कार्डधारकांना ७,००० रुपयांची त्वरित सूट मिळत आहे. पिक्सेल १० प्रोची किंमत १,०९,९९९ रुपये ठेवण्यात आली असून तो १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. यावर १०,००० रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

गुगल पिक्सेल १० सिरीजची विक्री सुरू, आकर्षक ऑफर्ससह मिळणार जबरदस्त फीचर्स
Samsung चा 'हा' नवीन फोन लवकरच होणार लाँच, 5000mAh बॅटरी आणि बजेट किंमतीसह मिळणार भन्नाट फीचर्स

त्याचप्रमाणे, पिक्सेल १० प्रो एक्सएलची किंमत १,२४,९९९ रुपये असून हा देखील १६ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या फोनवर देखील १०,००० रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. ही ऑफर्स एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवर लागू आहेत. ग्राहक हे हँडसेट फ्लिपकार्ट, क्रोमा, विजय सेल्स आणि गुगल स्टोअरवरून खरेदी करू शकतात.

गुगल पिक्सेल १० सिरीजची विक्री सुरू, आकर्षक ऑफर्ससह मिळणार जबरदस्त फीचर्स
iPhone 17 Launch: 'या' दिवशी बाजारात येणार नवीन आयफोन सीरिज, पाहा काय असेल खास वैशिष्ट्ये

वैशिष्ट्ये काय आहेत?

नवीन पिक्सेल १० सिरीजमध्ये गुगलचा टेन्सर जी५ प्रोसेसर देण्यात आला आहे. पिक्सेल १० आणि १० प्रोमध्ये ६.३ इंचाचा एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले असून पिक्सेल १० प्रो एक्सएलमध्ये ६.८ इंचाचा डिस्प्ले आहे. कॅमेराच्या बाबतीत, पिक्सेल १० मध्ये ४८ मेगापिक्सेल + १३ मेगापिक्सेल + १०.८ मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा आणि १०.५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. प्रो व्हेरिएंटमध्ये ५० मेगापिक्सेल + ४८ मेगापिक्सेल + ४८ मेगापिक्सेल रियर कॅमेरा सेटअप तर ४२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

गुगल पिक्सेल १० सिरीजची विक्री सुरू, आकर्षक ऑफर्ससह मिळणार जबरदस्त फीचर्स
Samsung Galaxy S25 FE स्पेसिफिकेशन्स आणि रंग पर्याय लीक, 'या' दिवशी होऊ शकतो लाँच

बॅटरी क्षमतेकडे पाहिले तर पिक्सेल १० मध्ये ४९७०mAh, पिक्सेल १० प्रोमध्ये ४८७०mAh तर पिक्सेल १० प्रो एक्सएलमध्ये ५२००mAh बॅटरी दिली आहे. सर्व मॉडेल्स अँड्रॉइड १६ ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात आणि यामध्ये वायरलेस मॅग्नेटिक चार्जिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे.

Q

गुगल पिक्सेल १० सिरीजची विक्री कधीपासून सुरू झाली?

A

२८ ऑगस्टपासून विक्री सुरू झाली आहे.

Q

 पिक्सेल १० वर किती कॅशबॅक मिळतो?

A

पिक्सेल १० प्रो आणि प्रो एक्सएल मॉडेल्सवर १०,००० रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

Q

हे फोन कुठे खरेदी करता येतील?

A

फ्लिपकार्ट, क्रोमा, विजय सेल्स आणि गुगल स्टोअरवर उपलब्ध आहेत.

Q

पिक्सेल १० सिरीजमध्ये कोणता प्रोसेसर आहे?

A

यात गुगल टेन्सर G5 प्रोसेसर देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com