iPhone 17 Launch: 'या' दिवशी बाजारात येणार नवीन आयफोन सीरिज, पाहा काय असेल खास वैशिष्ट्ये

Apple Event 2025: ॲपल आपल्या वार्षिक कार्यक्रमात नवीन आयफोन सीरिज लाँच करणार आहे. या मॉडेल्समध्ये खास वैशिष्ट्ये, अपग्रेडेड कॅमेरा आणि पॉवरफुल परफॉर्मन्स मिळणार आहेत. भारतीय चाहत्यांसाठी हा कार्यक्रम थेट पाहण्याची सुविधा उपलब्ध असेल.
APPLE IPHONE 17 SERIES LAUNCH ON SEPTEMBER 9 FEATURES, PRICE AND INDIA DETAILS
APPLE IPHONE 17 SERIES LAUNCH ON SEPTEMBER 9 FEATURES, PRICE AND INDIA DETAILS
Published On
Summary
  • अ‍ॅपलचा “Awe Dropping” इव्हेंट ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.

  • आयफोन १७ सीरिजसह आयफोन १७ एअर लाँच होण्याची शक्यता आहे.

  • प्रो मॉडेल्समध्ये अपग्रेडेड कॅमेरा आणि प्रोसेसर मिळणार आहेत.

  • भारतात कार्यक्रम रात्री १०:३० वाजता लाईव्हस्ट्रीम पाहता येईल.

अ‍ॅपलचा बहुप्रतिक्षित वार्षिक कार्यक्रम यावर्षी ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. “Awe Dropping” या शीर्षकाखाली आयोजित हा कार्यक्रम क्युपर्टिनो येथील अ‍ॅपल पार्कमधून सकाळी १० वाजता (पीटी) सुरू होणार असून भारतात तो रात्री १०:३० वाजता थेट पाहता येईल. कंपनीने आपल्या चाहत्यांसाठी Apple.com, Apple TV अ‍ॅप आणि YouTube वर थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

डिझाइन आणि स्पेसिफिकेशन?

या कार्यक्रमात अ‍ॅपल आयफोन १७ सीरिज सादर करण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, आयफोन १७, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स या मॉडेल्सबरोबरच यावेळी “iPhone 17 Air” नावाचा एक नवीन हलका व्हर्जनही बाजारात दाखल होऊ शकतो. डिझाइनमध्ये बदल, अतिशय पातळ बेझल्स आणि आकर्षक लुक ही या मॉडेलची वैशिष्ट्ये असतील, अशी माहिती समोर येत आहे.

लीक्सनुसार, आयफोन १७ एअर हा आजवरचा सर्वात पातळ आयफोन असू शकतो. याआधी सॅमसंगने गॅलेक्सी एस२५ एज लाँच केला होता, जो पातळ डिझाइनमुळे चर्चेत राहिला होता. मात्र ग्राहकांकडून त्याला विशेष प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे अ‍ॅपलचा हा नवा प्रयोग लोकांच्या पसंतीस उतरतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, प्रो मॉडेल्समध्ये मोठे कॅमेरा सेन्सर्स, प्रगत ऑप्टिकल सिस्टम आणि अपग्रेडेड प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. सध्या सॉफ्टवेअरमध्ये फारसे नवे फीचर्स नसल्याचेही लीकमध्ये स्पष्ट झाले आहे.

भारतात किंमत आणि उपलब्धता?

अ‍ॅपल आपली अधिकृत किंमत, प्री-ऑर्डर आणि विक्रीच्या तारखा कार्यक्रमानंतर जाहीर करणार आहे. साधारणपणे विक्रीची तारीख काही आठवड्यांनी निश्चित केली जाते. त्यामुळे भारतीय ग्राहकांना किंमत आणि प्री-ऑर्डरबाबतची माहिती कार्यक्रमानंतरच मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com