Samsung Galaxy S25 FE स्पेसिफिकेशन्स आणि रंग पर्याय लीक, 'या' दिवशी होऊ शकतो लाँच

Samsung Leaks: सॅमसंग गॅलेक्सी एस२५ एफईबाबत ऑनलाइन लीक वाढत आहेत. टिपस्टरनुसार स्पेसिफिकेशन, रंग आणि किंमत समोर आली असून ४ सप्टेंबरला हा फॅन एडिशन स्मार्टफोन लॉन्च होण्याची शक्यता आहे.
SAMSUNG GALAXY S25 FE FULL SPECS, COLORS AND EXPECTED LAUNCH DATE
SAMSUNG GALAXY S25 FE FULL SPECS, COLORS AND EXPECTED LAUNCH DATE
Published On
Summary
  • सॅमसंग गॅलेक्सी एस२५ एफई ४ सप्टेंबर २०२५ रोजी लाँच होण्याची शक्यता आहे.

  • फोनमध्ये ६.७-इंच AMOLED डिस्प्ले आणि Exynos 2400 प्रोसेसर मिळेल.

  • ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये ५०MP प्रायमरी कॅमेरा असेल.

  • बॅटरी ४,९००mAh क्षमतेची असून ४५W फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल.

सॅमसंगच्या फॅन एडिशन मालिकेतला पुढचा स्मार्टफोन गॅलेक्सी एस२५ एफई लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. या हँडसेटचे रेंडर्स आणि प्रमुख स्पेसिफिकेशन्स अलीकडेच समोर आले असून, यामुळे त्याच्या डिझाइन आणि फीचर्सची झलक मिळाली आहे. दक्षिण कोरियाच्या टेक कंपनीने अद्याप या फोनबद्दल अधिकृत घोषणा केलेली नसली तरी टिपस्टर्सनी त्याच्या डिझाइनपासून बॅटरी आणि कॅमेरापर्यंतची माहिती उघड केली आहे.

प्रसिद्ध टिपस्टर अहमद क्वाइडर यांनी सांगितले की गॅलेक्सी एस२५ एफई पाच रंग पर्यायांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. यात नेव्ही, डार्क ब्लू, लाईट ब्लू, ब्लॅक आणि व्हाईट या शेड्स असतील. हँडसेटमध्ये ६.७-इंचाचा डायनॅमिक एमोलेड डिस्प्ले दिला जाईल, ज्यामध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १,९०० निट्स पीक ब्राइटनेस असेल. डिस्प्ले आणि मागील पॅनेल दोन्हीकडे गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ प्रोटेक्शन मिळेल.

SAMSUNG GALAXY S25 FE FULL SPECS, COLORS AND EXPECTED LAUNCH DATE
Jio Recharge Plan: जिओचा ११९९ रुपयांचा खास प्लॅन, मिळणार ८४ दिवसांची वैधता, फ्री ओटीटी अन् बरंच काही...

फोनमध्ये सॅमसंगचा एक्सिनोस २४०० प्रोसेसर दिला जाणार असून त्याला ४,९०० एमएएच क्षमतेची बॅटरी सपोर्ट करेल. ही बॅटरी ४५ वॅट फास्ट चार्जिंगसह येणार आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, गॅलेक्सी एस२५ एफईला मागील मॉडेलपेक्षा १३ टक्के चांगला कूलिंग परफॉर्मन्स मिळेल. फोटोग्राफीसाठी, यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेन्स आणि ८ मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर ३x ऑप्टिकल झूमसह दिला जाईल. फ्रंट कॅमेरासाठी १२ मेगापिक्सेलचा शूटर दिला जाऊ शकतो.

SAMSUNG GALAXY S25 FE FULL SPECS, COLORS AND EXPECTED LAUNCH DATE
Whatsapp New Feature: तुम्हाला मिळालेली माहिती खरी की खोटी? Whatsapp देणार खात्री, जाणून घ्या नवं फिचर

हा स्मार्टफोन अँड्रॉइड १६-आधारित वन यूआय ८ वर चालेल आणि त्यात गॅलेक्सी एआयची सुविधा असेल. याशिवाय, आयपी६८ रेटिंगमुळे फोनला धूळ आणि पाण्यापासून संरक्षण मिळेल. तसेच वाय-फाय ६ई कनेक्टिव्हिटीचाही सपोर्ट दिला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy S25 FE यावर्षी ४ सप्टेंबरला लाँच होऊ शकतो. किंमतीबाबत बोलायचे झाले तर हा हँडसेट युरोपियन बाजारात EUR ६७९ (सुमारे ₹६९,०००) पासून उपलब्ध होऊ शकतो.

Q

Samsung Galaxy S25 FE कधी लाँच होणार?

A

मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन ४ सप्टेंबर २०२५ रोजी लाँच होण्याची शक्यता आहे.

Q

या फोनमध्ये कोणता प्रोसेसर असेल?

A

सॅमसंग गॅलेक्सी एस२५ एफईमध्ये Exynos 2400 प्रोसेसर दिला जाणार आहे.

Q

गॅलेक्सी एस२५ एफईमध्ये कोणता कॅमेरा सेटअप असेल?

A

यात ५०MP प्रायमरी, १२MP अल्ट्रावाइड आणि ८MP टेलिफोटो कॅमेरा (३x झूम) दिला जाणार आहे. फ्रंटला १२MP सेल्फी कॅमेरा असेल.

Q

या फोनची किंमत किती असू शकते?

A

युरोपियन बाजारात या फोनची किंमत EUR 679 (सुमारे ₹६९,०००) पासून सुरू होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com