Aadhaar Card Saam tv
बिझनेस

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

How To Link Mobile Number To Aadhaar Card: आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे. आधार कार्डशी लिंक असलेला फोन जर बंद झाला तर काय करावे ते जाणून घ्या.

Siddhi Hande

आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य

आधार कार्ड आणि मोबाईल नंबर ऑनलाइन पद्धतीने कसा लिंक करायचा

ऑनलाइन प्रोसेस जाणून घ्या

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे. जर तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक नसेल तर अनेक अडचणी येऊ शकतात. दरम्यान, तुमचा जो नंबर आधार कार्डला लिंक आहे तो बंद झाला असेल तर काय करावे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

तुम्ही तुमचा नवीन नंबरदेखील आधार कार्डशी लिंक करु शकतात.यासाठी ऑनलाइन खूप सोपी पद्धत आहे. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करायची ऑनलाइन प्रोसेस जाणून घ्या.

आधार कार्डला नवीन मोबाईल नंबर कसा लिंक करायचा? (How to link new mobile to aadhaar card)

सर्वात आधी तुम्हाला इंडियन पोस्टल सर्व्हिसच्या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि वैयक्तिक माहिती टाकायची आहे.

यानंतर तुम्हाला PPB Aadhaar Services ऑप्शन दिसेल.

यानंतर तुम्हाला Mobile/Email to Aadhaar Linking/Update टॅब दिसेल. यानंतर अपडेटच्या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल. यानंतर Confirm Service Request दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर ही रिक्वेस्ट पोस्ट ऑफिस आणि सरकारी आधार सेंटरवर जाईल.

यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन बायोमॅट्रिक व्हेरिफकेशन पूर्ण करुन मोबाईल अपडेट करु शकतात.

यानंतर तुम्हाला बायोमॅट्रिकसोबतच फॉर्म भरायचा आहे. यामध्ये नवीन नंबर टाकायचा आहे.

याचसोबत तुम्ही तुमच्या घराजवळच्या आधार एनरोलमेंट सेंटरवर जाऊनदेखील हा मोबाईल नंबर अपडेट करु शकतात.

यासाठी तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावे लागेल.

या प्रोसेसनंतर तुम्हाला रिक्वेस्ट नंबर URN मिळणार आहे. यावर जाऊन तुम्ही अपडेट स्टेट्‍स पाहू शकतात.

मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक का करावा लागतो?


आधारशी मोबाईल नंबर लिंक केल्याशिवाय OTP आधारित सेवा वापरता येत नाहीत आणि सरकारी कामे करण्यास अडचण येऊ शकते.

जुना नंबर बंद झाला असेल तर काय करावे?

तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा आधार एनरोलमेंट सेंटरवर जाऊन नवीन मोबाईल नंबर लिंक करू शकता.

आधारशी मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी किती शुल्क लागते?

मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागते.

अपडेट स्टेटस कसा तपासावा?

प्रोसेस पूर्ण झाल्यावर मिळालेल्या URN नंबरच्या आधारे तुम्ही UIDAI च्या वेबसाइटवर अपडेट स्टेटस पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रांजल खेवलकरांवरील खोट्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार

Amravati News: बापरे! दहा वर्षीय मुलीच्या पोटात अर्धा किलो केसांचा गोळा; शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश

Elephant Food: हत्ती काय खातो? तुम्हाला माहितीये का?

Honda N-One e: रेट्रो लूक...होंडाची नवीन N-One e कार, अल्टोपेक्षा लहान आणि खास वैशिष्ट्यांनी भरलेली

Nashik : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होणार! गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार | VIDEO

SCROLL FOR NEXT