EPFO News: नोकरी करत असताना किती PF काढू शकता? जाणून घ्या नियम

How Much PF Can You Withdraw: नोकरी चालू असताना आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढता येतात का? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. याबाबत आपण माहिती जाणून घेऊ.
How Much PF Can You Withdraw
EPFO Rule News saamtv
Published On

भविष्य निर्वाह निधी पैसा बचतीचा एक पर्याय तर आहेच याशिवाय भविष्यात गरज भासल्यास आर्थिक आधार म्हणून हा पर्याय असतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना काही ठराविक कारणांसाठी खातेदारांना पैसे काढण्याची मुभा देते. सदस्यांना त्यांच्या खात्यातून अंशतः किंवा पूर्ण रक्कम काढण्याची सुविधा देते. घर खरेदी, लग्न आणि बेरोजगारीदरम्यान अशा विविध गरजांसाठी निधी काढता येतो. पीएफ पोर्टल तसेच KYC पूर्ण असेल तर UMANG अ‍ॅपवरून देखील सहजपणे पीएफ क्लेम करता येतो. पण हे पैसे काढण्यासाठी काही अटी आणि मर्यादा आहेत. ते जाणून घेऊया.

कोणत्या परिस्थितीमध्ये आणि किती पैसे काढता येतात

घर खरेदी किंवा नवीन बांधकाम

नोकरीत किमान 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

खात्यातील एकूण शिल्लक रकमेच्या ९० टक्केपर्यंत पैसे काढता येतात.

ही सुविधा आयुष्यात फक्त एकदाच वापरता येते.

घराच्या दुरुस्तीसाठी सुद्धा खात्यातून पैसे काढता येतात.

जर तुमचे घर हे पाच वर्षे जुने असेल आणि त्याची दुरुस्ती करायची असेल तर पीएफ काढता येतो. यात बारा महिन्यांचा मूळ पगार + महागाई भत्ता (DA) एवढी रक्कम काढता येते. दरम्यान यासाठी स्व-घोषणापत्र सादर करणे गरजेचे असते.

मुलांचे शिक्षण किंवा लग्नासाठी आर्थिक खर्च

मुलांचे किंवा भावंडांचे लग्न किंवा उच्च शिक्षण यासाठी पीएफमधून पैसे काढता येतात. खातेदाराच्या वाट्याचा ५० टक्क्यांपर्यंत निधी काढता येतो. पण यासाठी यासाठी नोकरीत ७ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

पैशांची चणचण असेल तर

जर तुम्ही बेरोजगार असाल तर एकूण शिल्लक रकमेच्या ७५ टक्के रक्कम काढता येते. दोन महिने किंवा अधिक बेरोजगारी असल्यास उर्वरित २५ टक्के रक्कमही काढता येते आणि खाते बंद करता येतं.

पैसे कसे काढणार?

EPFO पोर्टल किंवा UMANG अ‍ॅपद्वारे पैसे काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा.

पण यासाठी UAN नंबर सक्रिय असावा आणि KYC पूर्ण झालेले असावे लागते. त्यामुळे ते सक्रिय करावे.

वैद्यकीय कारणासाठी त्वरित पैसे काढण्याची सुद्धा सुविधा आहे.

How Much PF Can You Withdraw
IRCTC Monsoon Travel: १७ दिवस रेल्वेप्रवास, ३० पेक्षा जास्त पर्यटनस्थळ; कमाल आहे 'रामायण यात्रा', काय-काय मिळतील सुविधा,जाणून घ्या

किती दिवसात खात्यात पैसे येतात?

पाच ते ५० दिवसात पैसे आपल्या बँक खात्यात येतात. ऑनलाइन क्लेम प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ५ ते ५० दिवस लागतात. क्लेम मंजूर झाल्यानंतर रक्कम थेट बँक खात्यात जमा होते.

नोकरी करताना पूर्ण पीएफ रक्कम काढता येते का?

नोकरी चालू असताना केवळ ठराविक कारणांसाठीच अंशतः रक्कम काढता येते. संपूर्ण पीएफ रक्कम फक्त निवृत्ती किंवा दोन महिन्यांहून अधिक बेरोजगारी नंतर काढता येते. सदस्यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com