पश्चिम बंगालमधील मतदार यादीतील घोळाबाबत सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वकील म्हणून कोर्टात युक्तिवाद केला. पश्चिम बंगालला निवडणूक आयोगाकडून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ममतांच्या याचिकेवर खंडपीठाने निवडणूक आयोग आणि पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून 9 फेब्रुवारीपर्यंत उत्तर मागितलं. काही महिन्यांनी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधीच राज्यातील राजकारण तापले आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने तृणमृल कॉँग्रेसच्या रणनीती ठरवणारी आयपॅक कंपनीवर छापा टाकला होता. यावेळी देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आक्रमक झाल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.