
आधारमधील नाव चुकीचे असल्यास पेंशन व सब्सिडी बंद होऊ शकते.
UIDAI ने घरबसल्या ऑनलाईन नाव दुरुस्तीची सुविधा सुरू केली आहे.
लॉगिन, OTP आणि डॉक्युमेंट्सच्या आधारे नाव अपडेट करता येते.
आधार कार्डवर (आधार कॅट) नावाचे चुकीचे स्पेलिंग किरकोळ वाटू शकते,परंतु तुम्हाला माहितीये यामुळे बँकिंग,सरकारी योजनांमध्ये नाव, पॅन,पासपोर्ट लिंकिंग यासारख्या अनेक प्रकरणांमध्ये अडचणी येऊ शकतात.नावात चुका असतील तर बँक खाते,UPI, KYC,सरकारी योजनांमध्ये अर्ज करताना अडचणी येतात.पॅन किंवा पासपोर्ट लिंक करताना नावाच्या स्पेलिंगमधील चुका अडचणीच्या ठरू शकतात.जर त्यात दुरुस्ती केली नाही तर नाव+डीओबी+वडिलांचे नाव जुळत नसल्याने व्हिसा किंवा प्रवेश प्रक्रिया रखडू शकते.
आधार कार्डमध्ये काही चूक झाल्यास त्याला दुरुस्त करण्यासाठी ई-केंद्रात जावे लागते. तेथे तासन् तास रांगेत उभं राहून दुरूस्तीचं काम करावं लागतं. पण ते पूर्ण होण्यास एक आठवड्याचा कालवधी लागत असतो. ही समस्येची दखल घेत UIDAI एक खास सुविधा सुरू केलीय. आधार कार्डमधील चुकीच्या नावाचे स्पेलिंग तुम्ही आता कोणत्याही कार्यालयात न जाता दुरुस्त करू शकता.
पूर्वी ही प्रक्रिया फक्त फील्ड ऑफिस व्हेरिएशन किंवा आधार सेंटरला भेट देऊन आधारमधील चुकी दुरुस्त करता येत होत्या. परंतु जुलै २०२५ मध्ये, UIDAI ने ही सुविधा पूर्णपणे डिजिटल आणि जलद केली आहे. आता तुम्ही घरबसल्या, तुमच्या मोबाईल नंबर आणि कागदपत्रांच्या मदतीने (पॅन, पासपोर्ट इ.). चुकी दुरुस्त करू शकता.
तुम्ही आता "माय आधार" पोर्टलवर लॉग इन करू शकता, "आधार अपडेट" पर्याय निवडू शकता आणि नाव तसेच पत्ता, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख यासारखे तपशील बदलू शकता. कागदपत्रे सादर करून काही दिवसांतच हे अपडेट पूर्ण होते.
Aadhaar मधील नावात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया जाणून घ्या स्टेप- बाय स्टेप
UIDAI च्या "माझा आधार" सेवेवर जा; लॉगिन करण्यासाठी तुमचा आधार क्रमांक आणि OTP वापरा.
अपडेट डेमोग्राफिक्स निवडा
"अपडेट आधार ऑनलाइन" वर क्लिक करा आणि पॅरामीटरमध्ये "नाव सुधारणा" निवडा. तुमचे बरोबर नाव टाइप करा आणि मंजूर केलेल्या सहाय्यक दस्तऐवजाचे स्कॅन अपलोड करा.
शुल्क भरा आणि नवीन आधार डाउनलोड करा
यानंतर ५० ते १०० रुपये ऑनलाइन शुल्क भरा. त्यानंतर URN (अपडेट रिक्वेस्ट नंबर) मिळेल ज्याद्वारे तुम्ही स्टेटस ट्रॅक करू शकता.
नवीन आधार डाउनलोड करण्याचा पर्याय २-३ दिवसांत दिसेल. आता नवीन आधार डाउनलोड करा.
आधार कार्डमधील चुकीच्या नावामुळे काय अडचणी येऊ शकतात?
चुकीच्या नावामुळे पेंशन, फ्री सब्सिडी, किंवा अन्य सरकारी लाभ बंद होऊ शकतात.
आधारमधील नाव घरबसल्या दुरुस्त करता येते का?
होय, UIDAI ने ऑनलाईन नाव दुरुस्तीची सुविधा दिली आहे.
आधारमधील नाव दुरुस्त करण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे?
UIDAI पोर्टलवर लॉगिन करून OTPद्वारे नाव सुधारता येते. डॉक्युमेंट्स अपलोड करणे आवश्यक असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.