काँग्रेसमध्ये गटबाजी, भाजप सत्ता खेचणार?

Congress Internal Conflict Impact On Chandrapur Civic Body: चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय खेळी रंगली आहे. काँग्रेसमधील गटबाजीचा फायदा घेत भाजप सत्ता खेचणार का? ठाकरे सेनेची भूमिका ठरणार निर्णायक.
Key political leaders amid intense power struggle in Chandrapur Municipal Corporation.
Key political leaders amid intense power struggle in Chandrapur Municipal Corporation.Saam Tv
Published On

राज्यात चंद्रपूर, लातूर, भिवंडी आणि परभणीत काँग्रेसला यश मिळालं मात्र चंद्रपूरमध्ये सत्तेच्या जवळ जाऊनही काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली. त्याचाच फायदा उचलण्याच्या तयारीत भाजप आहे. मात्र सत्तेसाठी भाजपला मदत लागणार आहे ती ठाकरे सेनेची.. ठाकरे सेनेचे सहा नगरसेवक आणि वंचितचे दोन नगरसेवक किंग मेकरच्या भूमिकेत आहेत. या दोन्ही पक्षांनी मिळून आठ सदस्यांची गटनोंदणी केली आहे.

जो आमच्या गटाचा महापौर करेल त्या पक्षाला आमचा पाठींबा असेल, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतलीय तर दुसरीकडे ठाकरेसेना आणि वंचितला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. मात्र चंद्रपुरात भाजपसोबत जाणार नाही, केवळ काँग्रेससोबत चर्चा करणार अशी ठाम भूमिका खासदार संजय राऊतांनी केलाय.

एकूण जागा आहेत 66... बहुमताचा आकडा 34 आहे. भाजप 23, काँग्रेस 27, काँग्रेस बरोबर आघाडी केलेल्या जनविकास सेना 3, ठाकरे सेना 6, वंचित बहुजन आघाडी 2, बसपा 1, शिंदेसेना 1, अपक्ष 2, एमआयएम 1 जागा असं संख्याबळ आहे. ठाकरे सेना आणि वंचितची युती आहे. तर काँग्रेस आणि जनविकास सेनेची आघाडी असल्यानं काँग्रेसची संख्या 30 वर पोहोचली आहे.

एकीकडे भाजप सत्ता जुळवण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे काँग्रेसच्या वादावर दिल्ली दरबारी तोडगा निघाला आहे. धानोरकर आणि वडेट्टीवार गटाला अडीच-अडीच वर्षे महापौरपद देण्याचा निर्णय झालाय. एकमेकांच्या कामात लुडबुड नको असे आदेशही हायकमांडनं दिल्याची सुत्रांची माहिती आहे. दरम्यान, नगरपालिका निवडणुकीतही चंद्रपूर जिल्ह्यातील 10 पैकी 7 ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला आता मनपा निवडणुकीतही यश मिळालं मात्र हे यश काँग्रेसला पचवता येत नाही हेच वास्तव आहे. आता पक्षश्रेष्ठींनी दोन्ही नेत्यांमध्ये घडवून आणलेला समेट टिकणार का? की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ करत सत्तेचा घास भाजप पळवणार? .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com