Hero Hf Deluxe Saam Tv
बिझनेस

Hero Hf Deluxe ची बाजारात मोठी मागणी, देते 65km चा मायलेज; किंमत फक्त 59,998 रुपये

Hero Bike: Hero MotoCorp देशात दर महिन्याला सर्वाधिक दुचाकींची विक्री करते. कंपनीची सर्वात स्वस्त बाईक Hero HF Deluxe ने यावेळी विक्रीच्या बाबतीत खूपच चांगली कामगिरी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Hero MotoCorp देशात दर महिन्याला सर्वाधिक दुचाकींची विक्री करते. कंपनीची सर्वात स्वस्त बाईक Hero HF Deluxe ने यावेळी विक्रीच्या बाबतीत खूपच चांगली कामगिरी केली आहे. ही बाईक100cc इंजिनमध्ये येते आणि दैनंदिन वापरासाठी चांगली आहे.

बाजारात मोठी मागणी

गेल्या महिन्यात Hf Deluxe 97,048 युनिट्सची विक्री झाली होती. तर गेल्या वर्षी कंपनीने 78,700 युनिट्सची विक्री केली होती. अशातच चला जाणून घेऊया या बाईकच्या फीचर्स आणि किंमतबद्दल अधिक माहिती...

Hero MotoCorp च्या HF Deluxe मध्ये 97.2cc इंजिन आहे. जे इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानासह येते. हे इंजिन 8.36 PS पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. बाईकमध्ये मेटल ग्रॅब रेल, ब्लॅक थीम आधारित एक्झॉस्ट, क्रॅश गार्ड, अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर्स यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

जबरदस्त लूकसाठी बाईकमध्ये ग्राफिक्स देण्यात आले आहेत. या बाईकमध्ये 9.1 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे. त्याची ग्राउंड क्लीयरन्स 165 मिमी आहे. बाईकच्या पुढील आणि मागील व्हील्समध्ये ड्रम ब्रेक उपलब्ध आहेत. Hero HF 100 ची किंमत 59,998 रुपयांपासून (एक्स-शो रूम किंमत) सुरू होते.

होंडा शाइनशी करते स्पर्धा

या बाईकमध्ये 98.98 cc 4 स्ट्रोक, SI इंजिन आहे. जे 5.43 kW चा पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क देते. हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. हे इंजिन पॉवर आणि परफॉर्मन्सच्या दृष्टीने चांगले आहे. मात्र शाइनचं इंजिन यापेक्षा थोडं स्मूथ आहे. डिझाइनच्या बाबतीत, शाइन 100 अधिक चाळगे वाटते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा गुडन्यूज देणार? का सुरू आहे अशी चर्चा

Jai Gujarat Row: शिंदेंच्या पक्षाची स्थापना सूरतमध्ये झाली; जय गुजरात’वरून संजय राऊतांचा घणाघात | VIDEO

Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT