फक्त 25 रुपयात धावणार 100km, एकदम जबरी आहे ही स्पोर्ट्स Electric Bike; कमी किंमतीत दमदार फीचर्स

Okaya Electric Bike: भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी वाढू लागली आहे. यातच अलीकडेच लॉन्च झालेली ओकायाची स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाईक Ferrato Disruptor ही आपल्या डिझाइन आणि फीचर्सच्या आधारे ग्राहकांना आकर्षित करत आहे.
फक्त 25 रुपयात धावणार 100km, एकदम जबरी आहे ही स्पोर्ट्स Electric Bike; कमी किंमतीत दमदार फीचर्स
Okaya Electric BikeSaam Tv

Okaya Electric Ferrato Disruptor:

भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी वाढू लागली आहे. यातच अलीकडेच लॉन्च झालेली ओकायाची स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाईक Ferrato Disruptor ही आपल्या डिझाइन आणि फीचर्सच्या आधारे ग्राहकांना आकर्षित करत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही एक किफायतशीर बाईक आहे. जी दररोज ऑफिस किंवा कॉलेजला जाण्यासाठी वापरली जाऊ शकते.

या बाईकची किंमत 1.60 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. यातच आम्ही 25 किमी, 50 किमी आणि 100 किमीनुसार या बाईकची रनिंग कॉस्ट काढली आहे, जी तुम्हालाही आश्चर्यचकित करेल. ही पेट्रोल बाईकपेक्षा खूपच किफायतशीर असल्याचे सिद्ध झालं आहे. ते कसं? हे जाणून घेऊ....

फक्त 25 रुपयात धावणार 100km, एकदम जबरी आहे ही स्पोर्ट्स Electric Bike; कमी किंमतीत दमदार फीचर्स
TVS ची ही बाईक देते 65 Kmpl मायलेज, फक्त लूक नाही फीचर्सही हाय क्लास; जाणून घ्या किंमत

25 रुपयांत 100 किलोमीटर धावणार

ओकायाने दिलेल्या माहितीनुसार, Ferrato Disruptor ही नवीन इलेक्ट्रिक बाईक अवघ्या 25 पैशांमध्ये एक किलोमीटर धावते. याचाच अर्थ जर तुम्ही एका दिवसात 100 किलोमीटर अंतर कापले तर तुमचा एकूण खर्च 25 रुपये होईल. जर तुम्ही या बाईकने दररोज 50 किलोमीटरचा प्रवास केला, तर त्याची किंमत 12.5 रुपये होईल. एवढेच नाही तर 25 किलोमीटर अंतर कापण्यासाठी तुमचा एकूण खर्च फक्त 6.25 पैसे येईल. या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही बाईक किफायतशीर ठरू शकते.

किती देते रेंज?

या बाईकमध्ये 3.97 kWh LFP बॅटरी आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर 129km रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. याची टॉप स्पीड ताशी 95 किमी आहे. ही बाईक 6.37 kW चा पॉवर आणि 228 Nm टॉर्क जनरेट करेल. ओकायाचा दावा आहे की, नवीन इलेक्ट्रिक बाईकची रनिंग कॉस्ट फक्त 25 पैसे प्रति किलोमीटर आहे. जर तुम्ही ही बाईक 50-60Kmph वेगाने चालवली तर तुम्हाला खूप चांगली ड्रायव्हिंग रेंज मिळू शकते. हायस्पीडमध्ये याची रेंज कमी होऊ शकते.

फक्त 25 रुपयात धावणार 100km, एकदम जबरी आहे ही स्पोर्ट्स Electric Bike; कमी किंमतीत दमदार फीचर्स
फक्त 57 मिनिटात होते फुल चार्ज, एका चार्जमध्ये देते 320 Km ची रेंज; जबरदस्त आहे Citroen ची ही स्वस्त इलेक्ट्रिक कार

ओकायाच्या नवीन इलेक्ट्रिक Ferrato Disruptor ची डिझाइन खूपच आकर्षक आहे. ही बाईक हुबेहुब पेट्रोल बाईकसारखी दिसते. ती इलेक्ट्रिक बाईक अजिबात दिसत नाही. यात पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर असेल. बाईकच्या दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक उपलब्ध आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com