फक्त 57 मिनिटात होते फुल चार्ज, एका चार्जमध्ये देते 320 Km ची रेंज; जबरदस्त आहे Citroen ची ही स्वस्त इलेक्ट्रिक कार

Citroen Electric Car: सध्या इलेक्ट्रिक कार ट्रेंडमध्ये आहे. अनेक लोक इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास पसंती देत आहेत. अशातच आज आम्ही तुम्हाला Citroen eC3 या स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत.
फक्त 57 मिनिटात होते फुल चार्ज, एका चार्जमध्ये देते 320 Km ची रेंज; जबरदस्त आहे Citroen ची ही स्वस्त इलेक्ट्रिक कार
Citroen Electric CarSaam Tv

Citroen eC3 Car:

सध्या इलेक्ट्रिक कार ट्रेंडमध्ये आहे. अनेक लोक इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास पसंती देत आहेत. अशातच आज आम्ही तुम्हाला Citroen eC3 या स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत. ही एक स्टायलिश इलेक्ट्रिक कार आहे. जी फक्त 6.8 सेकंदात 60kmph चा वेग गाठते.

ही कार फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, फास्ट चार्जरने ही कार फक्त 57 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. तसेच कारसोबत 15 amp प्लग चार्जर उपलब्ध आहे, जो 10.5 तासांत कारला पूर्ण चार्ज करतो.

किंमत आणि रेंज

Citroen eC3 चा फ्रंट लुक खूप डॅशिंग आहे. ही कार एका चार्जवर सुमारे 320 किमी धावते. ही कार 12.52 लाख रुपयांच्या ऑन रोड किंमतीत उपलब्ध आहे. कारचे टॉप मॉडेल 14.31 लाख रुपयांच्या ऑन रोड किमतीत येते. तरुणांना लक्षात घेऊन कारमध्ये 14 रंगांचे पर्याय दिले जात आहेत. Citroen eC3 मध्ये 10.2 इंच टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे. ही कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये येते.

कारमध्ये रियर पार्किंग सेन्सर आणि मॅन्युअल एसीची सुविधा आहे. ही 5 सीटर कार आहे, जी 29.2 kWh क्षमतेसह पॉवरफुल बॅटरी पॅकसह येते. या इलेक्ट्रिक कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. कारमध्ये फ्रंट माउंटेड इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 56 bhp ची पॉवर आणि 143 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

कारमध्ये Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटी आणि ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आहेत. सेफ्टीसाठी या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल फीचर असून, या कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. यात किलेस एंट्रीसह मागील सीटवर चाइल्ड अँकरेज सारखे फीचर्सही ग्राहकांना मिळतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com