Hero Splendor सह या 5 बाईक देतात जबरदस्त मायलेज, किंमत 1 लाखपेक्षा कमी; पाहा लिस्ट

Best Mileage Bike in India: आपण देशात उपलब्ध असलेल्या काही अशा बाईक्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सर्वाधिक मायलेज देतात. चला तर पाहू संपूर्ण यादी...
Best Mileage Bike in India
Best Mileage Bike in IndiaSaam Tv

Best Mileage Bikes Under 1 Lakh in India:

भारतात आजही कारपेक्षा बाईक प्रेमींची संख्या ही अधिक आहे. भारत ही जगातील सर्वात मोठी दुचाकी बाजारपेठ आहे. यातच देशात एक असा मोठा वर्ग आहे, जो मायलेज बाईकला अधिक पसंती देतो. अशातच आपण देशात उपलब्ध असलेल्या काही अशा बाईक्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सर्वाधिक मायलेज देतात. चला तर पाहू संपूर्ण यादी...

Honda Shine 100

Honda Shine 100 ही या याच्यातील पहिली बाईक आहे. भारत याची किंमत 65,011 रुपये (एक्स-शोरूम) आहे. Honda Shine 100 मध्ये तुम्हाला 65 किमी/प्रति लिटर इतके मायलेज मिळते. बाईकमध्ये 98.98cc इंजिन देण्यात आले आहे. जे 7.28 bhp चा पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Best Mileage Bike in India
Government Schemes: व्याजाशिवाय मिळेल 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, जबरदस्त आहे ही सरकारी योजना

Honda SP 125

Honda SP 125 बाईक भारतात 86,747 रुपयांच्या किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. याची किंमत 91,298 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. इंजिन स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर बाईकमध्ये 124cc इंजिन आहे. ही बाईक 65 किमी/प्रति लिटर मायलेज देते आणि 10.72 bhp पॉवर आणि 10.9 Nm टॉर्क जनरेट करते.  (Latest Marathi News)

Bajaj Platina 100

या यादीतील तिसरी बाईक Bajaj Platina 100 आहे. जी भारतात 61,617 ते Rs 66,119 (एक्स-शोरूम) या किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. बजाज प्लॅटिना 100 मध्ये तुम्हाला 75 किमी/प्रति लिटरचे जबरदस्त मायलेज मिळेल. बाईकमध्ये 102cc इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे. बाईक 7.8bhp पॉवर आणि 8.34Nm टॉर्क जनरेट करते.

Best Mileage Bike in India
Galaxy A35 Galaxy A35 Review: सॅमसंगचे नवे 5Gवाले लॉन्च; दमदार फिचर्स अन् कमी किंमत ऐकून तुम्हीही कराल खरेदी

TVS Sport

मायलेजच्या बाबतीत TVS Sport हा एक चांगला पर्याय आहे. भारतात याची किंमत 63,301 रुपये आहे. जी 69,090 रुपयांपर्यंत जाते. TVS स्पोर्ट 80 किमी/प्रति लिटर मायलेज देते. यात109.7cc इंजिन मिळते. जे 8.18 bhp पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते.

Hero Splendor Plus Xtec

Hero Splendor Plus Xtec ही बाईक भारतात खूप लोकप्रिय आहे. याची एक्स-शोरूम किंमत 79,705 रुपये आहे. Hero Splendor Plus Xtec मध्ये तुम्हाला 60 किमी प्रति लिटर इतके मायलेज मिळते. ही बाईक पॉवरफुल 97.2cc इंजिनसह सुसज्ज आहे. जी 7.9 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com