आयसीआयसीआय बँकेनंतर आता आणखी एका बँकेने ग्राहकांना धक्का दिला आहे. आता एचडीएफसी बँकेनेदेखील किमान बॅलेंस वाढवण्याची घोषणा केली आहे. एचडीएफसी बँकेने सेव्हिंग अकाउंटवर किमान बॅलेंस वाढवण्याची घोषणा केली होती. आता तुम्हाला २५००० रुपये खात्यात ठेवणे अनिवार्य आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.
एचडीएफसी (HDFC Bank) बँकेने किमान बॅलेंसची लिमिट २५००० रुपये केली आहे.याआधी ही लिमिट १०,००० रुपये होते. हे नवीन नियम १ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाले आहे. हे नियम १ ऑगस्टनंतर जे ग्राहक अकाउंट ओपन करतील त्यांना लागू होणार आहेत.
एचडीएफसी बँकेचा ग्राहकांना धक्का (HDFC Bank Increase Minimum Balance Limit)
आता १ ऑगस्ट २०२५ नंतर जे नवीन ग्राहक अकाउंट ओपन करतील त्यांना खात्यात किमान २५००० रुपये बॅलेंस ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा सेव्हिंग अकाउंटवर चार्ज कापला जाईल. हे नियम मेट्रो, अर्बन शहरांमध्ये लागू आहेत. याआधी मिनिमम बॅलेंसची लिमिट १०,००० रुपये होती. त्यानंतर आता ही लिमिट जवळपास अडीचपट वाढवण्यात आली आहे.
ICICI बँकेनेदेखील वाढवली होती लिमिट (ICICI Bank Increase Minimum Balance Limit)
आयसीआयसीआय बँकेने तर किमान बॅलेंस ठेवण्याची रक्कम ५०,००० रुपये केली आहे. याआधी ही रक्कम १०,००० रुपये होती. जर तुमच्या अकाउंटमध्ये ५०,००० रुपये नसतील तर तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. एकीकडे सरकारी बँका किमान बॅलेंस ठेवण्याचा नियम रद्द करत आहेत तर दुसरीकडे प्रायव्हेट बँका आपला किमान बॅलेंस वाढवत आहेत. आयसीआयसीआय बँकेने तर मिनिमम बॅलेंसची लिमिट ५ पटीने वाढवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.