Har Ghar Tiranga Saam Tv
बिझनेस

Har Ghar Tiranga: 'हर घर तिरंगा' मोहिमेत असं व्हा सहभागी; सेल्फी कसा अपलोड करायचा? प्रोसेस जाणून घ्या

Har Ghar Tiranga Certificate And Selfie: स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व नागरिकांना हातात तिरंगा घेऊन सेल्फी अपलोड करायला सांगितले आहे.

Siddhi Hande

१५ ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. यावर्षी या अभियानाचे तिसरे वर्ष आहे.या मोहिमेअंतर्गत तुम्ही तुमच्या घरासमोर तिरंगा फडकवत सेल्फी अपलोड करायचा आहे.

'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत संपूर्ण देशातील नागरिकांना तिरंगा हातात घेऊन आपल्या सेल्फी काढायला सांगितले आहे.हा सेल्फी तुम्हाला हर घर तिरंगा या मोहिमेच्या वेबसाइटवर अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट देण्यात येईल. चला तर मग जाणून घेऊया या योजनेत सेल्फी कसा अपलोड करायचा आणि सर्टिफिकेट कसं मिळवायचं.

सर्वप्रथम तुम्हाला हर घर तिरंगाच्या अधिकृत वेबसाइट https://harghartiranga.com/ या वेबसाइटला भेट द्यायची आहे. याच वेबसाइटवर तुम्हाला सेल्फी अपलोड करायचा आहे.

या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला Click To Participate या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुमची आवश्यक माहिती भरायची आहे. यात तुम्हाला तुमचे नाव, फोन नंबर, देश, राज्य ही माहिती भरायची आहे.

संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला Pledge या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट बनवण्यासाठी Genrate Certificate या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Stones : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? रोज खा 'ही' ४ हिरवी पाने

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार, एकमेकांना धडक देत २ वाहने दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT