आजपासून जीएसटीचे नवे दर लागू
काही वस्तू स्वस्त तर काही महागल्या
काय स्वस्त आणि काय महाग याची संपूर्ण लिस्ट वाचा
आजपासून जीएसटीचे नवे दर लागू झाले आहेत. जीएसटीमध्ये कपात करण्यात आली आहे. जीएसटीमधील कपातीमुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. औषधे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून ते अगदी कारच्या किंमती स्वस्त झाल्या आहेत. दरम्यान, लक्झरी वस्तूंवरील टॅक्स वाढणार आहेत. यामुळे मात्र रोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहेत. दरम्यान, कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत आणि कोणत्या महाग याची संपूर्ण यादी वाचा.
दोन टॅक्स स्लॅब रद्द (Only 2 GST Tax Slab)
आता जीएसटीमध्ये फक्त दोनच टॅक्स स्लॅब असणार आहेत. आता ५ टक्के आणि १८ टक्के हे दोन मुख्य टॅक्स स्लॅब असणार आहे. त्यामुळे अनेक गोष्टी या टॅक्स स्लॅबमध्येच येणार आहे. १२ आणि २८ टक्के स्लॅब रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक वस्तू या स्वस्त होणार आहेत. काही लक्झरी वस्तू आणि तंबाखुयुक्त पदार्थांच्या किंमती मात्र महाग होणार आहे. काही वस्तू २८ टक्के टॅक्स स्लॅबमधून १८ टक्के आणि ५ टक्के टॅक्स स्लॅबमध्ये शिफ्ट होणार आहेत. तर काही वस्तू २८ टक्के टॅक्स स्लॅबवरुन ४०टक्के टॅक्स स्लॅबमध्येही शिफ्ट करण्यात आल्या आहेत. रोजच्या वापरातील अनेक वस्तू स्वस्त झाल्यामुळे गृहिणींना मात्र दिलासा मिळाला आहे.
जीवनावश्यक वस्तू स्वस्त (Products Cheaper After GST 2.0)
दूध
तूप, बटर, डेअरी प्रोडक्ट्स
पनीर
रोटी, चपाती, खाकरा
पास्ता नूडल्स
केक, बिस्किट
नमकीन, पॅकेज फूड
सॉस, मसाले
चहा
पास्ता, नूडल्स
नारळपाणी
टूथपेस्ट, टूथब्रश, टूथ पावडर,
साबण, शॅम्पू, हेअर ऑइल
शेव्हिंग क्रिम, लोशन
पिझ्झा ब्रेड
स्टीलची भांडी
मातीची भांडी
ड्राय फ्रुट्स
खजूर, अंजीर, अननस
फळ (संत्री,लिंबू)
चॉकलेट
सूप
प्रिजर्व्ह भाज्या
बेकिंग पावडर
फ्रिज
एसी
टीव्ही
ओव्हन
इंडक्शन कुकर, हीट
मिक्सर, ज्युसर
शिलाई मशीन
इस्त्री
लाकडी फर्निचर
काचेच्या बांगड्या
हँडक्राफ्टेड हँडबॅग, पर्स
पेन्सिल, पेन, चॉक, खोडरबर
औषधे, डायग्नोस्टिक किट
कॉन्टॅक्ट लेन्स
सायक
डिशवॉशर
बाईक
स्कूटर (350cc पर्यंत)
ऑटो रिक्षा
इलेक्ट्रिकल वाहन
टायर, ट्रॅक्टरचे पार्ट्स
या गोष्टी महागणार (These Items Price Will Increase)
तंबाखुयुक्त पदार्श
पान मसाला
कॅफेनयुक्त पेय
सिगारेट
तंबाखू, निकोटीनयुक्त पदार्थ
कोळसा
लिग्नाइट
बाईक (350cc पेक्षा जास्त इंजिन असलेले)
SUV आणि लक्झरी कार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.