
नवरात्रीआधी सरकारचा मोठा निर्णय
जीएसटी दरात कपात
जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त
नवरात्रीआधी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठी खुशखबर दिली आहे. आता सरकारने जीएसटी दरात कपात केली आहे. जीएसटीमध्ये आता फक्त २ स्लॅब असणार आहेत. यामुळे अनेक जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती कमी होणार आहेत. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर होणार आहे.हे नवीन जीएसटी दर २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. याबाबत आता अर्थमंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.
जीएसटीचे नवे दर २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. याबाबत ३ सप्टेंहर रोजी घोषणा करण्यात आली होती.यामध्ये अनेक दरांच्या किंमती ५ टक्के टॅक्स स्लॅबमध्ये समावेश करण्यात आल्या आहेत.
GST मध्ये दोनच टॅक्स स्लॅब
सध्या जीएसटीचे ४ टॅक्स स्लॅब आहेत. ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के. त्यानुसार वस्तूंच्या किंमती ठरतात. दरम्यान, आता यातील दोन टॅक्स स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. आता फक्त ५ आणि १८ टक्के टॅक्स स्लॅब राहणार आहे.
सर्वसामान्यांना होणार फायदा (GST Reforms Benefits)
जीएसटीमधील या बदलाचा सर्वात जास्त फायदा हा सर्वसामान्यांना होणार आहे. ज्या वस्तू किंवा सर्व्हिस २८ टक्के टॅक्स स्लॅबमध्ये येत होत्या त्या आता १८ टक्के टॅक्स स्लॅबमध्ये समाविष्य होणार आहे. त्यामुळे या वस्तूंवरील जीएसटी १० टक्क्यांनी कमी होणार आहे. दरम्यान, काही लक्झरी वस्तूंवर २८ऐवजी ४० टक्के जीएसटी लागणार आहे. परंतु या वस्तू खूप महागड्या असणार आहेत.
जीएसटीमध्ये या बदलामुळे दूध, दही, पनीर या जीवनावश्यक गोष्टींवरील जीएसटी कमी होणार आहे. याचसोबत कार, टू व्हिलरवरील जीएसटी कमी होणार आहे. कंपन्यांच्या पार्ट्सवरील कर रद्द केल्यानंतर आपोआप कार स्वस्त होणार आहेत. याचसोबत २५०० पेक्षा कमी किंमतीतीत वस्तूंवर जीएसटी लागू होणार नाही. अन्नपदार्थांवरीलदेखील जीएसटी कमी होणार आहे. त्यामुळे रोजच्या वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.