Lakhani Bajar Samiti : लाखनी बाजार समितीत बिलांचा घोटाळा; बोगस जीएसटी बिल दाखवून फसवणूक, ६० टनाचा काटा जप्त

Bhandara News : समितीला दरमहा ६० हजार रुपयांचा तोटा होणार आहे. डॉ. दिपराज इलमकार यांच्या प्रयत्नांमुळे सदर घोटाळा उघडकीस आला असून, तत्कालीन संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली
Lakhani Bajar Samiti
Lakhani Bajar SamitiSaam tv
Published On

शुभम देशमुख 
लाखनी (भंडारा)
: लाखनी बाजार समितीत बनावट बिलांचा घोटाळा उघडकीस आला आहे. तत्कालीन संचालक मंडळाने बनावट जीएसटी बिल सादर करून वैध मापन शास्त्र कार्यालयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात २०२० मध्ये बसवलेला ६० मे. टन क्षमतेचा तोल काटा जप्त करण्यात आला असून यामुळे समितीला दरमहा ६० हजार रुपयांचा तोटा होणार आहे. 

भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील बाजार समितीच्या बनावट बिलांचा घोटाळा सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिपराज इलमकार यांच्या प्रयत्नांमुळे उघडकीस आला आहे. बाजार समितीच्या मुख्य यार्डात २०२० मध्ये नवीन वाहन काटा बसवण्यात आला. मुळात हा काटा सुरू करण्यापूर्वी वैध मापन शास्त्र कार्यालयाकडून पडताळणी आणि मुद्रांकन करणे अनिवार्य असते. मात्र, तत्कालीन संचालक मंडळाने मे. वेटोट्रानिक्स वेईंग सिस्टीम, रायपूर या कंपनीच्या नावाने ५ लाख ८ हजार ५८० रुपयांचा काटा आणि ७० हजार रुपयांच्या १००० किलो वजनांच्या बनावट जीएसटी बिल तयार केले.

Lakhani Bajar Samiti
Farmer : आठ महिन्यात ११८३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; पश्चिम विदर्भात सर्वात मोठा आकडा आला समोर

कंपनीचा जीएसटी नंबर झाला होता रद्द 
वजन काटा घेतलेल्या कंपनीचा जीएसटी नंबर १ ऑक्टोबर २०१९ रोजी रद्द करण्यात आला होता. तरी देखील याचे बनावट बिल १४ मार्च २०२० रोजी साकोलीच्या वैध मापन शास्त्र कार्यालयात सादर करून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी डॉ. दिपराज इलमकार यांनी नागपूरच्या सहनियंत्रक वैध मापन शास्त्र विभागीय कार्यालयात तक्रार दाखल केली. या नंतर झालेल्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले. 

Lakhani Bajar Samiti
Shirdi : बॅनर फाडल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; फिर्याद देणाऱ्याचा कारनामा उघड, चारजण ताब्यात

अखेर काटा जप्त 
दरम्यान वेटोट्रानिक्स वेईंग सिस्टीमने बाजार समितीला काटा कधीच विकला नाही आणि बिलही दिले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तर समितीचे सचिव संजय पारोदे यांनीही देखील सदर कंपनीकडून काही विकत घेतले नसल्याचे सांगितले आहे. तर हा काटा 'नॉन-स्टँडर्ड' असल्याचे सिद्ध झाल्याने तो सुरू ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ९ सप्टेंबर २०२५ रोजी सदर काटा जप्त करून सील करण्यात आले. आता हा काटा बंद असल्याने बाजार समितीचे आर्थिक नुकसान होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com