GST New Rate: आजपासून बचत महोत्सव! कपडे, टीव्ही, फ्रिज ते दूध, कार अन् औषधं झाली स्वस्त; संपूर्ण लिस्ट वाचा

GST New Rate: आजपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत. यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी होणार आहे. दरम्यान, काय स्वस्त आणि काय महाग होणार ते वाचा सविस्तर.
GST New Rate
GST New RateSaam Tv
Published On
Summary

नवरात्रीत सर्वसामान्यांना दिलासा

जीएसटी दरात कपात

फक्त ५ आणि १८ टक्के टॅक्स स्लॅब

जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या

कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या? लिस्ट वाचा

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सरकारने सर्वसामान्यांना खुशखबर दिली आहे. आजपासून GST 2.0 लागू होणार आहे. यामुळे अनेक जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती कमी होणार आहेत. जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत. यावर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

GST New Rate
Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

जीएसटी बदलावर पीएम मोदी काय म्हणाले? (PM Modi On GST Changes)

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, २२ सप्टेंबरपासून जीएसटीमधील नवीन बदल लागू होणार आहे. जीएसटी बचत उत्सव सुरु आहे. यामुळे तुमची बचत होणार आहे. तुमच्या आवडीच्या वस्तू स्वस्त दरात खरेदी कराल. यामुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय, महिला, व्यापारी, दुकानदारांना फायदा होणार आहे. देशाच्या प्रत्येक कुटुंबाचा आनंद आणखी वाढणार आहेत.

आता फक्त २ टॅक्स स्लॅब (GST New Tax Slab)

अर्थमंत्री निर्मला सितारामान यांनी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला होता. आता देशात फक्त दोनच जीएसटी टॅक्स स्लॅब असणार आहे. फक्त ५ आणि १८ टक्के जीएसटी टॅक्स स्लॅब लागू होणार आहे. १२ आणि २८ टक्के टॅक्स स्लॅब रद्द करण्यात आला आहे. यामुळे अनेक गोष्टी दुसऱ्या टॅक्स स्लॅबमध्ये शिफ्ट करण्यात आल्या आहे. यामुळे दूध, कपड्यापासून ते अगदी वाहनांच्या किंमती कमी होणार आहेत.

कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या? (What Items Get Cheaper After GST Reforms Check new Rate)

जीवनाश्यक वस्तू

तूप, पनीर, बटर, नमकीन, जॅम, ड्राय फ्रुट्स, कॉफी आणि आइस्क्रिमवरील जीएसटीमध्ये कपात करण्यात आली आहे. अन्नपदार्थांवर आता फक्त ५ टक्के जीएसटी लागू होणार आहे. तो याआधी १२ किंवा १८ टक्के होता.

औषधांवरील जीएसटीमध्ये कपात

आता ग्लूकोमीटर, डायग्नोस्टिक किट्स तसेच अनेक औषधांवर फक्त ५ टक्के जीएसटी लागणार आहे. सरकारने मेडिकल स्टोअर्संना किंमती कमी करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

बांधकाम खर्चात कपात

सीमेंटवरील जीएसटी २८ टक्क्यांवरुन १८ टक्के करण्यात आला आहे. यामध्ये १० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

टीव्ही, एसी, वॉशिंग मशीनच्या किंमती

टीव्ही, एसी, वॉशिंग मशीनच्या किंमतीवरील टॅक्स कमी करण्यात आला आहे. आता यावर फक्त १८ टक्के जीएसटी लागणार आहे. हा जीएसटी आधी २८ टक्के होता.

GST New Rate
GST Reforms: GST कपातीचा Skoda कारवर परिणाम; महागड्या गाड्यांची किंमत घसरली, जाणून घ्या किंमत

वाहनांवरील जीएसटी कमी

आता लहान वाहनांवर १८ टक्के तर मोठ्या वाहनांवर २८ टक्के जीएसटी लागणार आहे. याआधी मोठ्या वाहनांवर २८ टक्के जीएसटी त्याचसोबत २२ टक्के सेस कर लागायचा. आता हा कर एकत्रित ४० टक्के करण्यात आला आहे.

साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, कपड्यांवरील जीएसटी कमी

आता हेअर ऑइल, साबण, टूथब्रश, शेव्हिंग क्रिम या वस्तूंवर फक्त ५ टक्के जीएसटी लागणार आहे. २५०० रुपयांपेक्षा कमी रुपयांच्या कपड्यावर कोणताही जीएसटी लागणार नाहीये.

GST New Rate
GST Reform: नवरात्रोत्सवाचा आनंद वाढणार; दूध, तेल, साबण ते टीव्ही, फ्रीज झालं स्वस्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com