
सरकारने आयटीआर भरण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबरपर्यंत वाढवली.
तरीही करदाते ३१ डिसेंबरपर्यंत लेट फी भरून रिटर्न दाखल करू शकतात.
लेट फाइलिंगसाठी ₹५,००० दंड, तर ५ लाखांखालील उत्पन्नासाठी ₹१,००० दंड.
Income Tax Return : आयकर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी आयटीआर भरण्यासाठीची मुदत वाढवण्यात आली आहे. इन्कम टॅक्स रिटर्नसाठीची पूर्वीची तारीख ३१ जुलै २०२५ ही होती. त्यानंतर १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली होती. आता सीबीडीटीने आयटीआर भरण्याची अंतिम तारीख एका दिवसाने वाढवली आहे. आयटीआर १६ सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत आयटीआर भरु शकतो हे तुम्हाला ठाऊक आहे का?
आयटीआर भरणाऱ्या करदात्यांकडून वेबसाइट संथ गतीने चालत असल्याच्या तक्रारी येत होत्या. अनेकांना फॉर्म डाउनलोड करण्यात अडचणी येत होत्या. हे लक्षात घेत कर विभागाने आयटीआरची अंतिम मुदत १५ सप्टेंबरवरुन १६ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. पण जर काही कारणास्तव १६ सप्टेंबरपर्यंतही आयटीआर भरता आला नाही. तर काळजीचं कारण नाही. तुम्ही उशिरा पेमेंट करुन ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आयटीआर दाखल करु शकता.
लेट फायलिंग
लेट फायलिंग म्हणजेच बिलेटेड रिटर्न याचा अर्थ देय तारखेला किंवा त्यापूर्वी दाखल न केलेला इनकम टॅक्स रिटर्न. आयकर वेबसाइटनुसार, जर एखादी व्यक्ती देय अंतिम मुदत असलेल्या तारखेला दाखल करु शकला नाही, तर तो मागील वर्षाचा रिटर्न टॅक्स निर्धारण वर्ष संपण्याच्या ३ महिन्यांच्या आधी किंवा कर निर्धारण पूर्ण होण्यापूर्वी दाखल करु शकतो.
दंड किती असेल?
जर तुम्ही देय तारखेनंतर रिटर्न दाखल केले, तर कलम २३४ एफ अंतर्गत विलंब शुल्क भरावे लागेल. बहुतेक करदात्यांना ५,००० रुपये दंड आहे. पण जर एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपर्यंत असेल, तर दंडाची रक्कम १,००० रुपये असेल. कलम २३४ एफ नुसार, कलम १३९ (१) अंतर्गत देय तारखेनंतर रिटर्न दाखल केल्यास ५,००० रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. नाहीतर, उत्पन्न जास्त असल्यास शुल्क आकारले जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.