Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले, ग्राहकांना महागाईचा धक्का; जाणून घ्या किती झाली दरवाढ?

Today Gold Price : सोन्याचा भाव वाढत असल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. दोन दिवसात सोन्याच्या भावात घट झाली होता. आता पुन्हा भाव वाढले आहेत.
Gold Price Today
Gold Price Todayx
Published On
Summary
  • सोन्याच्या दरात आज वाढ.

  • सोनं महागलं, खिशाला फटका.

  • महागाईमुळे खरेदीदारांना झळ.

Gold Price : सोन्याच्या दरामध्ये सतत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांमध्ये सोन्याचा भाव कमी झाला होता. आता नवरात्रौत्सव, दसरा या सणांच्या निमित्ताने सोन्याची मागणी वाढत असल्याने त्याच्या किंमतीतही वाढ होत आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच भार पडत आहे. आजही सोनं महाग झाल्याने सोने खरेदीदारांच्या खिशाला झळ बसणार आहे.

Goodreturns वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार १६ सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरामध्ये ८७० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत ११,१९,३०० रुपये इतकी झाली आहे. १०० ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये ८,७०० रुपयांची वाढ झाली आहे.

Gold Price Today
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० आले, सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? वाचा सविस्तर

आज २२ कॅरेट सोन्याचा भाव?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत १०,२६० रुपये इतकी आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत ८२,०८० रुपये इतकी आहे.

  • २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,०२,६०० रुपये इतकी आहे.

  • २२ कॅरेट १००० ग्रॅम सोन्याची किंमत १०,२६,००० रुपये इतकी आहे.

आज २४ कॅरेट सोन्याचा भाव?

  • २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ११,१९३ रुपये इतकी आहे.

  • २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ८९,५४४ रुपये इतकी आहे.

  • २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत १,११,९३० रुपये इतकी आहे.

  • २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ११,१९,३०० रुपये इतकी आहे.

Gold Price Today
PM Kisan Yojana: दिवाळीआधी शेतकऱ्यांना खुशखबर मिळणार! पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार? समोर आली अपडेट

सकाळी दहाच्या सुमारास एमसीएक्स गोल्ड ३ ऑक्टोबर कॉन्ट्रॅक्ट्स ०.०२ टक्क्यांनी किंवा २७ रुपयांनी वाढून ११०२०७ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​होते. तर एमसीएक्स सिल्व्हर ५ डिसेंबर कॉन्ट्रॅक्ट्स ०.१४ टक्क्यांनी किंवा १८१ रुपयांनी वाढून १२९६१० रुपये प्रति किलोग्रॅमवर होते. सत्रादरम्यान, सत्रादरम्यान, सोन्याचा इंट्राडे उच्चांक ११०२९८ रुपये प्रति १० ग्रॅम आणि इंट्राडे नीचांकी ११००७० रुपये प्रति १० ग्रॅम होता, तर चांदीचा इंट्राडे उच्चांक १२९७२० रुपये प्रति किलोग्रॅम आणि इंट्राडे नीचांकी १२९२१४ रुपये प्रति किलोग्रॅमवर ​​होता.

Gold Price Today
Sukanya Samruddhi Yojana: मुलींसाठी सरकारची खास योजना! महिन्याला २९१६ रुपये गुंतवा अन् १६.१६ लाख मिळवा

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि अ‍ॅस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर्सचे ग्रुप सीईओ मोहित कंबोज यांनी दिलेल्या माहितीनुसार,

सोने (GOLD)

भारतीय बाजारात सध्या सोन्याचा दर ₹१,०९,५११ प्रति १० ग्रॅम आहे. सोन्यात अजूनही चढती कमान सुरू आहे, याचेच हे दर द्योतक आहेत. गुंतवणूकदार आता सोने केवळ दागिन्यांसाठी नाही तर सुरक्षित गुंतवणूक (Safe-Haven Asset) म्हणून पाहत आहेत.

जागतिक पातळीवरील महागाई, जगातील प्रमुख देशांमध्ये व्याजदर कपातीची अपेक्षा आणि विशेषत: US Fed कडून आलेला सौम्य (Dovish) संकेत यामुळे डॉलर कमकुवत झाला आहे, आणि त्याचा थेट फायदा सोन्याला मिळत आहे.

रुपया घसरल्यामुळे आयात खर्च वाढतो आणि त्यामुळे देशांतर्गत (स्थानिक) दर झपाट्याने वर जातात. व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहता, सोने हे Risk Hedge म्हणून मजबूत आहे.

पण दर जेव्हा ₹१,१०,००० च्या वर जातील, विशेषतः सणासुदी आणि विवाहसोहळ्यांच्या कालावधीत गुंतवणूकदार नफावसुली करण्याची शक्यता आहे.

एकंदरीत, तुमच्या पोर्टफोलिओला स्थिरता द्यायची असेल किंवा गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय हवा असेल तर सोने आकर्षक आहे – फक्त योग्य वेळ आणि रणनीती महत्त्वाची आहे.

Gold Price Today
ITR Filling: कामाची बातमी! आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ, सरकारने घेतला मोठा निर्णय

चांदी (SILVER)

सध्या चांदीचा दर ₹१,२७,७९१ प्रति किलो आहे. चांदीला Safe-Haven Demand बरोबरच इलेक्ट्रॉनिक्स, सोलार आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातून भक्कम आधार मिळत आहे.

सोन्याची मागणी प्रामुख्याने जागतिक अनिश्चिततेवर अवलंबून असते, तिथे चांदीला औद्योगिक वापरातूनही मागणी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा साखळीतील बंधने व मर्यादा यामुळे बाजारपेठ तंग आहे. तसेच भारतात आयातशुल्क, वाहतूक व रुपयाच्या घसरणीमुळे दर आणखी वाढले आहेत.

गुंतवणूकदारांसाठी चांदी म्हणजे सोन्याला पूरक पर्याय, तसेच औद्योगिक मागणीशी जोडलेले गुंतवणूक साधन. मात्र, चांदीचे दर सोन्यापेक्षा जास्त चढ-उतार दाखवू शकतात, त्यामुळे अल्पकालीन कच्चामाल खर्चावर (Raw Material Cost) लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

शेवटी, सध्याच्या स्तरावर चांदीत वाढीची क्षमता अधिक आहे, पण ती जागतिक व्यापार, व्याजदर आणि व्यावसायिक व्यावसायिक चक्र यांच्याशी थेट निगडीत आहे.

Gold Price Today
ATM ला जाण्याची गरज नाही, फोनवरच OR कोड स्कॅन करून झटक्यात मिळवा पैसे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com