
युपीआयद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून थेट पैसे काढण्याची सुविधा लवकरच सुरू होणार आहे.
देशभरातील २० लाखांहून अधिक बिझनेस कॉरस्पॉन्डंट्सवर ही सेवा उपलब्ध होणार आहे.
ग्राहक त्यांच्या मोबाईल अॅपवरून स्कॅन करून एटीएमशिवाय पैसे मिळवू शकतील.
ही सुविधा ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल.
पैसे काढण्यासाठी यापुढे तुम्हाला एटीएम शोधण्याची गरज भासणार नाही. कारण लवकरच मोबाइलवरच क्यूआर कोड स्कॅन करून तुम्हाला झटक्यात पैसै मिळवता येणार आहे. भारतामधील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना या सोयीचा सर्वाधिक फायदा होईल. त्यांना आता एटीएममध्ये ज्याप्रमाणे पैसे काढता येतात तसेच बिजनेस कॉरेस्पाँडेंटद्वारे (बीसी) पैसे काढता येणआर आहे. ही नेमकी काय योजना आहे हे आपण जाणून घेणार आहोत...
सध्या देशभरामध्ये सगळीकडे यूपीआयचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. युपीआय जे सध्या पैसे पाठविण्यासाठी, बिल भरण्यासाठी आणि ऑनलाइन शॉपिंगसाठी वापरले जाते. यूपीआयद्वारे आता पैसे देखील काढता येतात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आता क्यूआर कोड स्कॅन करून पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी लाखो बिझनेस करस्पॉन्डंट्स(बीसी) म्हणजेच किराणा दुकानदार किंवा छोटे सर्व्हिस पॉइंट याठिकाणी क्यूआर कोड असेल. ग्राहक त्यांच्या मोबाइलमधील कोणत्याही युपीआय अॅपवरून कोड स्कॅन करून पैसे काढू शकतील.
इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आरबीआयकडून परवानगी मागितली आहे की यूपीआयद्वारे रोख रक्कम काढण्याची सुविधा बिजनेस कॉरेस्पाँडेंटवर देखील दिली जाऊ शकते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही सुविधा अद्यापही नियोजन टप्प्यावर आहे आणि त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
सध्या युपीआयमधून कार्डलेस रोख रक्कम काढणे फक्त त्या एटीएममधून किंवा काही निवडक दुकानदारांकडून शक्य आहे. त्यासाठीही एक मर्यादा आहे. शहरे आणि गावांमध्ये प्रत्येक व्यवहारावर फक्त एक हजार रपयांपर्यंतची रोख रक्कम काढता येते. ग्रामीण भागात ही मर्यादा दोन हजारांपर्यंत आहे. आता ही सुविधा देशभरातील २० लाखांहून अधिक बिझनेस कॉरस्पॉन्डंट्सपर्यंत वाढवण्याची योजना आखली जात आहे.
बिझनेस कॉरस्पॉन्डंट्स म्हणजे ही छोटी केंद्रे किंवा लोक आहेत जे बहुतेकदा दुर्गम किंवा बँकिंग नसलेल्या भागात राहतात आणि बँक शाखांचा विस्तार म्हणून काम करतात. म्हणजेच ते लोकांना बँकिंग आणि वित्तीय सेवा प्रदान करण्यासाठी मदत करतात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने स्वतः २०१६ मध्ये युपीआय अॅप तयार केले आणि ते लाँच केले. सध्या युपीआयला देशभरातील नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
सरकार आणि बँकिंग क्षेत्र युपीआयद्वारे रोख रक्कम काढणे अधिक सोपो करण्यासाठी काम करत आहेत. जेव्हा एखादा ग्राहक बिझनेस कॉरस्पॉन्डंट्स आउटलेटला भेट देतो तेव्हा तो युपीआयमधील क्यूआर कोड स्कॅन करेल. त्यानंतर ग्राहकाच्या खात्यामधील रक्कम डेबिट होईल. ती रक्कम बिझनेस कॉरस्पॉन्डंट्सच्या खात्यात क्रेडिट होईल. त्यानंतर बिझनेस कॉरस्पॉन्डंट्स ग्राहकांना रोख रक्कम देतील. सध्या ग्राहक बिझनेस कॉरस्पॉन्डंट्सकडे असणाऱ्या माइक्रो एटीएम मशीनमध्ये एटीएम कार्ड टाकून पैसे काढत आहे. पण सध्या युपीआयमुळे बरेच जण ऑनलाईन व्यवहार करतात आणि ते एटीएममध्ये खूप कमी प्रमाणात जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.