GPay Pocket Money Saam Tv
बिझनेस

GPay Pocket Money: GPayचं हटके फीचर! आता बँक अकाउंटशिवाय करा UPI पेमेंट; पॉकेट मनी आहे तरी काय?

What is GPay Pocket Money: गूगल पे अॅपने नवीन फीचर लाँच केले आहे. गूगल पे पॉकेट मनी फीचर असं याचं नाव आहे. यामध्ये ज्या मुलांचे अकाउंट नाही ते आपल्या पालकांच्या यूपीआय आयडीद्वारे पैसे ट्रान्सफर करु शकतात.

Siddhi Hande

गूगल पेचं नवीन फीचर

गूग पे पॉकेट मनी फीचर

मुलांनाही तुमच्या अकाउंटवरुन करता येणार ऑनलाइन पेमेंट

भारतातील लाखो लोक यूपीआयचा वापर करतात. यूपीआयद्वारे पेमेंट करणे खूप कॉमन झाले आहे. गुगल पेद्वारे रोज कोट्यवधि लोक पेमेंट करतात. दरम्यान, गुगल पेमध्ये अनेक फिचर्स जोडण्यात आले आहे. यामुळे तुम्ही सहजासहजी कोणालाही पैसे पाठवू शकतात. दरम्यान, आता यामध्ये नवीन गुगल पॉकेट मनी फीचर अॅड झाले आहे. याद्वारे तुम्ही पेमेंट करु शकतात.

गूगल पे पॉकेट मनी (Google Pay Pocket Money)

गूगल पॉकेट मनी ही सुविधा त्या युजर्ससाठी बेस्ट आहे. ज्यांच्या मुलांचे किंवा आईवडिलांचे बँक खाते नाही आहे. त्यांच्यासाठी ही सुविधा बेस्ट ठरणार आहे. गूगल पे पॉकेट मनीद्वारे पैसे पाठवणारा (प्रायमरी युजर) त्यांच्या बँक खात्याचा वापर करुन दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवण्यास मदत करते. यामध्ये पूर्ण सुरक्षा असते. यामध्ये खर्चाची मर्यादा निश्चित असते. याचसोबत पेमेंट अप्रूव करण्याचा पर्याय असतो. म्हणजेच दुसरी व्यक्ती जे पैसे पाठवणार आहे त्याला मंजुरी द्यायची की नाही हे तुमच्यावर अवलंबून असते.त्यामुळे आता ज्यांचे बँक खाते नाहीये. त्यांना ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. ते खूप सहज पैसे पाठवू शकतात.

यूपीआय सर्किल (UPI Circle)

गूगल पे अॅपने काही दिवसांपूर्वी यूपीआय सर्किल फीचर सुरु केले आहे. यामध्ये यूपीआय अकाउंट होल्डर दुसऱ्या लोकांना तुमच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते.यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नसतील तरी तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर करु शकतात. यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. यामध्ये सुरक्षेचीही काळजी घेतली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT