WhatsApp मधून पैसे कमावण्याची सुवर्णसंधी, लवकरच लाँच होतोय 'हा' जबरदस्त फीचर

Shreya Maskar

व्हॉट्सॲप नवीन फीचर

व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामध्ये युट्यूब चॅनलप्रमाणे तुम्ही व्हॉट्सॲप चॅनलद्वारे पैसे कमावू शकता. हे केवळ फॉलोअर्स वाढवण्यापुरते मर्यादित राहणार नाही, तर तुम्ही तुमच्या कंटेंटमधून पैसेही कमावू शकाल.

WhatsApp's New Feature | pinterest

चॅनलसाठी पेड सबस्क्रिप्शन

रिपोर्टनुसार, मेटाच्या मालकीचे व्हॉट्सॲप एका नवीन मॉनेटायझेशन फीचरवर काम करत आहे. या फीचरअंतर्गत, क्रिएटर्सना त्यांच्या चॅनलसाठी पेड सबस्क्रिप्शन सुरू करता येईल, ज्यामुळे त्यांना एक्सक्लुझिव्ह कंटेंट शेअर करून पैसे कमवता येतील.

Paid Subscriptions for Channels | pinterest

हेतू काय?

सध्या, हे फीचर टेस्टिंग आणि डेव्हलपमेंटच्या टप्प्यात आहे. अद्याप युजर्ससाठी उपलब्ध झालेले नाही. कंपनीला व्हॉट्सॲप चॅनल अधिक क्रिएटर-फ्रेंडली बनवायचे आहेत.

Objective | pinterest

फायदा काय?

व्हॉट्सॲपच्या नवीन फीचरमुळे, युजर्स त्यांच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राइब करू शकतील. त्या बदल्यात, त्यांना अशा एक्सक्लुझिव्ह पोस्ट्स मिळतील ज्या सामान्य लोकांसाठी उपलब्ध नसतील.

Benefits | pinterest

पारदर्शकता

व्हॉट्सॲप या फीचरमध्ये पारदर्शकता देखील आणत आहे. चॅनलवरील पेड सबस्क्राइबर्सची संख्या सर्व युजर्सना दिसेल. यामुळे लोकांना चॅनलचा कंटेंट किती विश्वासार्ह आणि लोकप्रिय आहे हे समजणे सोपे जाईल.

Transparency | pinterest

सबस्क्रिप्शन शुल्क

चॅनल क्रिएटर्स त्यांचे सबस्क्रिप्शन शुल्क स्वतः ठरवू शकतील. ही सेटिंग चॅनलच्या माहिती विभागात उपलब्ध असेल.

Subscription Fees | pinterest

व्हॉट्सॲप

युजर्सचा गोंधळ टाळण्यासाठी, व्हॉट्सॲप एक फिल्टर पर्याय देखील देईल. यामुळे युजर्सना मोफत आणि एक्सक्लुझिव्ह कंटेंट स्वतंत्रपणे पाहता येईल.

WhatsApp | pinterest

चॅनलला सबस्क्राइब करा

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्याही चॅनलला सबस्क्राइब करणे अनिवार्य नसेल. युजर्स फक्त मोफत कंटेंटचा आनंद घेऊ शकतील, तर सशुल्क कंटेंट हा एक अतिरिक्त पर्याय असेल.

Subscribe to a Channel | pinterest

NEXT : WhatsApp चा मोठा धमाका! AI फीचरमुळे चॅटिंग बदलणार, नेमकं काय होणार? वाचा...

WhatsApp | GOOGLE
येथे क्लिक करा...