Sakshi Sunil Jadhav
तुम्ही वापरत असलेल्या WhatsAppमध्ये मोठ्या बदल होणार आहेत. ज्यामध्ये तुम्हाला मेसेजसाठी जास्त कष्ट करुन टायपिंग करावी लागणार नाही.
तुम्हाला चॅटींग करताना आता नवे AI फिचर मदर करणार आहे. त्याने तुम्ही वेळात चॅटींग करु शकणार आहात. कारण यामध्ये तुम्हाला तुमचे मेसेज सेकंदात एडीट करुन मिळणार आहेत.
AI तुमच्या आधीच्या चॅटच्या आधारावर योग्य रिप्लाय सुचवेल. त्याने चॅटींगचा वेळ वाचेल आणि तुमचे संभाषण अधिक प्रभावी होईल.
यामध्ये तुम्हाला हवा तसा मेसेज जास्त प्रोफेशनल, फ्रेंडली किंवा साधा बनवता येईल.
आधी फक्त रिफ्रेजिंगपर्यंत मर्यादित असलेलं फीचर आता जास्त स्मार्ट झालं आहे.
सुरुवातीला मर्यादित देशांमध्ये असलेलं हे फीचर आता हळूहळू सर्वांना वापरता येणार आहे.
WhatsApp चा दावा आहे की AI वापरतानाही तुमचे पर्सनल चॅट सुरक्षित राहतील.
चॅट ओपन करा मग टेक्स्ट बॉक्सवर टॅप करा. पुढे स्टिकर सेक्शनमध्ये जाऊन AI आयकॉन निवडा. या सोप्या सेटिंग्सने तुम्ही चॅटींग करु शकता.
बॉसला रिप्लाय देणे किंवा प्रोफेशनल मेसेज तयार करण्यात हा फीचर खूप मदत करेल. तसेच यामध्ये वन-टॅप स्टोरेज management, इमोजी टाइप करताच स्टिकर सजेशन या भन्नाट सुविधा मिळणार आहेत.