Sakshi Sunil Jadhav
आजच्या डिजिटल युगात वीज, पाणी, मोबाईल, इंटरनेट आणि OTT सब्सक्रिप्शनसाठी आपण UPI AutoPay हा पर्याय वापरतो. पण बऱ्याचवेळेस याच सुविधेमुळे नकळत पैसे खात्यातून कट होत राहतात.
फ्री ट्रायल घेताना AutoPay सुरू होतो आणि आपण नंतर तो बंद करायला विसरतो. त्यामुळे तुमच्या अकाउंटमधले पैसे नकळत कट होतात.
फक्त अॅप डिलीट केल्याने पेमेंट बंद होत नाही. AutoPay मॅन्युअली बंद करावा लागतो.
लहान रक्कम दर महिन्याला कट होऊन वर्षभरात मोठा खर्च होऊ शकतो. त्यामुळे महिन्याला तपासणी करणं गरजेचं आहे.
फोन पेमधील ऑटो पे बंद करण्यासाठी Profile, Payment Management,AutoPay, Service निवडा , Pause किंवा Delete AutoPay हा पर्याय निवडा.
Paytmमधील ऑटो पे बंद करण्यासाठी Profile, UPI Settings, Automatic Payments, Service, Cancel Payment हे पर्याय निवडून ऑटोपे ऑप्शन बंद करा.
गुगल पेमधील ऑटो पे बंद करण्यासाठी You Tab, AutoPay, Live, Service, Cancel AutoPay, UPI PIN टाका आणि तुमचं ऑटो पे ऑप्शन बंद करा.
फ्री ट्रायल घेताना रिमाइंडर लावा आणि फक्त आवश्यक सेवांनाच AutoPay सुरू ठेवा. नाहीतर बऱ्याचदा यामध्ये तुमचे पैसे कट केले जाऊ शकतात.