PM Mudra Loan Scheme Saam Tv
बिझनेस

PM Mudra Loan: व्यवसाय सुरु करायचाय? सरकार देतंय २० लाखांचे लोन; पीएम मुद्रा योजना आहे तरी काय?

PM Mudra Loan Scheme: स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी तरुणांना २० लाख रुपयांचे लोन मिळणार आहे. पीएम मुद्रा लोन योजनेत तुम्हाला कर्ज दिले जाणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवली आहे. यामध्ये तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठीही सरकार प्रोत्साहन देते. केंद्र सरकारच्या पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी लोन दिले जाते. या योजनेत तुम्हाला १० लाखांचे लोन मिळते. या योजनेत भारतातील कोणताही नागरिक अर्ज करु शकतो. (PM Mudra Loan Yojana)

देशातील तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.या योजनेत तुम्हाला आर्थिक मदत केली जाते. या योजनेत आधी १० लाखांचे लोन दिले जायचे मात्र, आता २० लाखांपर्यंतचे लोन तुम्ही घेऊ शकतात.

पीएम मुद्रा लोन योजनेत तीन कॅटेगरीत लोन दिले जाते. एक म्हणजे शिशु लोन, दुसरं किशोर लोन आणि तिसरी कॅटेगरी म्हणजे तरुण लोन. यामध्ये तुम्हाला ५० हजारांपासून ते २० लाखांपर्यंत लोन मिळते. (PM Mudra Loan Scheme)

जर तुम्हाला पीएम शिशु मुद्रा लोनअंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही गॅरंटीची गरज नाही. तसेच यासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी चार्ज केली जात आहे. या योजनेत तुम्हाला ९ ते १२ टक्के व्याज द्यावे लागते. जर तुम्हालाही स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा असेल अन् तुमच्याकडे पुरेसे भांडवल नसेल तर तुम्ही या योजनेत लाभ घेऊ शकतात. हे पैसे वापरुन तुम्ही चांगला व्यवसाय सुरु करु शकतात.

पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत लहान व्यापाऱ्यांना, लहान दुकानदार, फूड प्रोसेसिंग युनिट अशा व्यवसायांसाठी लोन घेऊ शकतात. या योजनेत १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात. फक्त अर्जदाराची कोणतीही डिफॉल्ट हिस्ट्री नसावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT