LPG e-KYC Deadline Extended  meta ai
बिझनेस

LPG KYC Deadline Extended: LPG गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी! e-KYC ची अंतिम तारीख वाढली, जाणून घ्या नवी तारीख

LPG e-KYC 2026: LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता आधार आधारित ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. घरबसल्या अधिकृत अॅपच्या मदतीने e-KYC पूर्ण करता येईल.

Sakshi Sunil Jadhav

एलपीजी ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आधार कार्डावर आधारित एलपीजी ई-केवायसी पूर्ण करण्याची शेवटची मुदत वाढवण्यात आली आहे. याआधी ग्राहकांना १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. आता ही मुदत वाढवून २३ ऑगस्ट २०२६ करण्यात आली आहे. त्यामुळे अजून ई-केवायसी न केलेल्या ग्राहकांना सुद्धा दिलासा मिळाला आहे.

नवीन डेडलाइन काय?

स्वातंत्र्यदिन आणि त्यानंतरच्या सुट्ट्यांमुळे बऱ्याच ग्राहकांना वेळेत ई- केवायसी पूर्ण करता आली नाही. त्यामुळे ग्राहकांना आणखी काही दिवसांची मुदत वाढवून दिलेली आहे. पण याचा अर्थ ई-केवायसीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं नाही. दिलेल्या मुदतीत सर्वांनी प्रोसेस पूर्ण करणं ग्राहकांसाठी महत्त्वाचं आहे.

२३ ऑगस्टपर्यंत ई-केवायसी नाही केली तर...

ई-केवायसी पूर्ण केली नाही तर लगेच गॅस कनेक्शन बंद होईल, असं नाही. पण, ई-केवायसी न केलेल्या ग्राहकांना घरगुती दरात एलपीजी सिलेंडर मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अनुदानित किंवा घरगुती दराचा लाभ घेण्यासाठी कायम ठेवण्यासाठी ई-केवायसी वेळेत पूर्ण करणे फायदेशीर ठरेल.

घरबसल्या कशी कराल ई-केवायसी?

ग्राहकांना ई-केवायसीसाठी गॅस एजन्सीमध्ये जाणं गरजेचं नाही. संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत अॅपद्वारे ऑनलाइन प्रोसेस पूर्ण करता येते.

इंडेन ग्राहक: IndianOil ONE अॅपद्वारे आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन.

भारतगॅस ग्राहक:Hello BPCL अॅपद्वारे ई-केवायसी.

HP गॅस ग्राहक: HP PAY अॅपद्वारे प्रक्रिया पूर्ण करता येते.

ऑनलाइन ई-केवायसी करताना अडचणी आल्यावर ग्राहक आपल्या एलपीजी वितरकाकडे जाऊनही प्रोसेस पूर्ण करू शकतात. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता २३ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणं योग्य ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Fall: शॅम्पू लावताच तुमचे केस गळू लागतात? 'या'५ सवयी ठरतात कारणीभूत

तुरूंगात असताना माझ्यावर विषप्रयोगाचा संशय, राऊतांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ

Fact Check: डिजेविरोधी बापटांचाच डीजेवर डान्स? काय म्हणता, बापट डीजेवर नाचले?

शिंदेसेनेला आणखी एक झटका, शिक्षणमंत्री दादा भुसेंच्या अधिकारांवर कात्री

पुण्यात पोलीस भरतीतील घोटाळा उघड, बनावट क्रीडा प्रमाणपत्रांद्वारे नोकरीवर डल्ला

SCROLL FOR NEXT