8th pay commission update Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, वाढीव पगार आणि एरियर कधीपर्यंत मिळणार?

8th Pay Commission latest update for central employees: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट आहे. यानुसार वाढीव पगार आणि थकबाकी कधीपर्यंत मिळणार याची माहिती समोर आली आहे.

Priya More
  • ८ वा वेतन आयोग पगारवाढीबाबत मोठी अपडेट

  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना एरियर कधी मिळणार याबाबत माहिती आली समोर

  • ८ व्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची शक्यता

लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि वेतनधारक आठव्या वेतन आयोगानुसार वाढीव पगार आणि एरियर म्हणजेच थकबाकी कधीपर्यंत मिळणार याची वाट पाहत आहेत. अशामध्ये याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगासाठी देशभरातील विविध भागांमधील कर्मचारी संघटना आणि युनियन्ससोबत वारंवार बैठका घेऊन चर्चा करत आहेत. फिटमेंट फॅक्टरसंदर्भात विविध स्तरांवर मागण्या केल्या जात आहेत, ज्यामुळे किमान मूळ वेतनात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.

नोव्हेंबर २०२५ मध्ये टर्म्ल ऑफ रेफरन्स जारी झाल्यानंतर आठव्या वेतन आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, अहवाल सादर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला आणखी ३ ते ६ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे नवीन वेतन आणि भत्ते २०२७ च्या उत्तरार्धात लागू होण्याची शक्यता आहे.

आठव्या वेतन आयोगाने थकबाकीची तारीख अधिकृतपणे जाहीर केली नसली तरी मागील वेतन आयोगांच्या पद्धतीनुसार नवीन नियम मागील आयोगाची मुदत संपल्यानंतरच्या दिवसापासून लागू केले जाण्याची शक्यता आहे. सातवा वेतन आयोग ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२६ पासून सुधारित वेतन आणि थकबाकी मिळण्याची अपेक्षा आहे. म्हणजे जेव्हा कधी नवीन वेतनश्रेणी लागू होईल तेव्हा कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२६ पासून तोपर्यंतची संपूर्ण एरियर म्हणजे थकबाकी मिळेल.

आठवा वेतन आयोग सर्व संबंधित घटकांच्या मागण्या ऐकण्यासाठी देशभरातील विविध शहरांना सातत्याने भेटी देत ​​आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे केंद्रीय संस्था, संघटना आणि संस्थांना त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याआधी पुणे, डेहराडून आणि नवी दिल्ली येथेही अशाच प्रकारच्या बैठका पार पडल्या होत्या. जून २०२६ मध्ये जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमधील कर्मचारी संघटनांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्याचे आयोगाचे नियोजन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : संकटाचा सामना करावा लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार

सर्वात मोठा पक्षप्रवेश! 25,000 कार्यकर्त्यांनी हाती घेतला धनुष्यबाण; एकनाथ शिंदेंचा 'मविआला' हादरा

Ratnagiri: गावठी बॉम्बच्या स्फोटाने रत्नागिरी पुन्हा हादरली, १३ वर्षीय मुलाच्या हाताची बोटं तुटली

कर्जतहून पनवेलला अवघ्या काही मिनिटांत पोहोचणार; नव्या रेल्वे मार्गिकेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची 3 ठिकाणी घेतली झाडाझडती

SCROLL FOR NEXT