8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर

Big Update In 8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे.
8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर
8th Pay Commission google
Published On

Summary -

  • ८व्या वेतन आयोगामुळे मोठी पगारवाढ शक्य

  • सुमारे ५० लाख कर्मचाऱ्यांना फायदा

  • महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल

  • २०२६ पासून नवीन वेतन लागू होण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर वेतन संरचना, महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल करण्याच्या तयारीला आता वेग आला आहे. जर आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात लक्षणीय वाढ होऊ शकते. जवळपास ५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

पगारवाढ किती होऊ शकते?

आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा परिणाम अंदाजे ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख निवृत्तीवेतनधारकांवर होईल. सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८,००० रुपयांवरून ५१,४८० रुपयांपर्यंत वाढू शकते. ही वेतनवाढ वेतनश्रेणीच्या १८ वेगवेगळ्या स्तरांवर आधारित असेल. प्रत्येक स्तरावरील सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या सध्याच्या मूळ वेतनानुसार वेगवेगळ्या सुधारणा दिसून येईल.

8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

DA आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये काय बदल होईल?

आठवा वेतन आयोगामुळे फक्त पगारवाढच करणार नाही तर महागाई भत्ते निश्चित करण्याच्या पद्धतीतही बदल होऊ शकतो. महागाई भत्त्याच्या पातळीचा पगारवाढीवर थेट परिणाम होईल. फिटमेंट फॅक्टरमधील संभाव्य वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे एकूण उत्पन्न आणि निवृत्तीनंतरचे लाभ यामध्ये लक्षणीयरीत्या वाढ होईल. या लाभामध्ये पेन्शन आणि ग्रॅच्युइटी यांचा समावेश आहे.

8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर
8th Pay Commisssion: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगार ₹१६,५६० रुपयांनी वाढण्याची शक्यता;वाचा सॅलरी कॅल्क्युलेशन

नवीन वेतन रचना कधी लागू होणार?

आठव्या वेतन आयोगाची अधिकृत अधिसूचना १७ जानेवारी २०२५ रोजी जारी करण्यात आली. नवीन वेतन संरचना १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. आयोग २०२७ च्या मध्यापर्यंत आपल्या अंतिम शिफारसी सादर करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मागील वेतन आयोगांचा इतिहास पाहता ज्यांना स्थापनेपासून अंमलबजावणीपर्यंत साधारणपणे २ ते ३.५ वर्षे लागतात. कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लाभांसाठी २०२६ च्या अखेरपर्यंत किंवा २०२७ पर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर
8th Pay Commission: आता पगार थेट ₹18,000 वरून ₹69,000? सरकारचा हा निर्णय ठरवणार कर्मचाऱ्यांचे भविष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com