

आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारक अनेक दिवसांपासून वेतन लागू होण्याची वाट पाहत आहेत. नव्या दिल्लीत झालेल्या बैठकीत कमर्चारी संघटनेने सरकारकडे मोठी मागणी केली आहे. ती मागणी पूर्ण झाली की, सरकारी कर्मचाऱ्यांची चांदीच चांदी होईल.
कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलेरी १८,००० रुपयांवरुन ६९,००० रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. नॅशनल काउंसिलिंक (National Council - Joint Consultative Machinery) च्या कर्मचारी पक्षाच्या आणि आयोगामध्ये याची पहिली औपचारिक चर्चा झाली. ही चर्चा २८ ते ३० एप्रिल रोजी झाली. याचा मुख्य उद्देश हा ३६ लाख केंद्र सरकारी आणि लाखो पेंशन धारकांच्या वेतन रचनेतील बदलांवर चर्चा करणे हा होता.
कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे ती, २०१६ पासून महागाई प्रचंड वाढत चालली आहे. आजच्या काळात शिक्षण, आरोग्य, घराचं भाडं आणि डिजिटल खर्च मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. त्यामुळे सध्याचा पगार हा कमी पडतो. त्याने गरजा भागल्या जात नाहीत. जर ३.८३ फिटमेंट फॅक्टर लागू झाला, तर पेंशनमध्ये सुद्धा मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ, समजा, सध्या ९ हजार पेन्शन घेणाऱ्यांना जवळपास ३४ हजारपर्यंत रक्कम मिळू शकते.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल होऊ शकतो. वाढलेला पगार म्हणजे वाढलेली खरेदी क्षमता आणि चांगली जीवनशैली असा याचा अर्थ होईल. त्यामुळे सरकारच्या अंतिम निर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय गेमचेंजर ठरू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.