8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! आठव्या वेतन आयोगासाठी उचलले महत्त्वाचे पाऊल

8th Pay Commission Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आठव्या वेतन आयोगासाठी दिल्लीत ३ दिवसीय बैठक होत आहे. यामध्ये फिटमेंट फॅक्टरबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On
Summary

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

आठव्या वेतन आयोगासाठी तीन दिवसीय बैठक

बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या उद्देशाने महत्त्वाची पाऊले उचलली जात आहे. आता आठव्या वेतन आयोगासाठी तीन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. कालपासून या बैठकीला सुरुवात झाली आहे. ही बैठक दिल्लीत होत आहे. उपसचिव अभय एन. सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ते ३० एप्रिलदरम्यान होणाऱ्या बैठकीत फिटमेंट फॅक्टर आणि बेसिक सॅलरी या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! ८व्या वेतन आयोगात ₹50,000 बेसिक सॅलरीची शक्यता, काय आहेत नेमक्या मागण्या?

तुमचा पगार किती वाढेल?

दिल्लीतील या बैठकीत कर्मचारी संघटना आणि युनियनच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत ३ महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

फिटमेंट फॅक्टर- कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७ आहे. हा फिटमेंट फॅक्टर ३.२५ किंवा त्यापेक्षा जास्त करण्याची मागणी केली जात आहे.

बेसिक सॅलरी- फिटमेंट फॅक्टरवर मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत वाढ होईल.

निवृत्तीवेतन आणि भत्ते- निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि महागाई भत्ता आणि इतर भत्त्यांबाबत शिफारसीदेखील तयार केल्या जातील.

8th Pay Commission
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! पगार ४ पटीने वाढणार? बेसिक सॅलरी इतकी होणार; वाचा कॅल्क्युलेशन

आयोगाकडे १८ महिन्यांचा वेळ

सरकारने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. अर्थ मंत्रालयाचे राज्य मंत्री पंकज चौधरी यांच्या म्हणण्यांनुसार, आयोगाकडे अंतिम अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी आहे. सध्या आयोग राज्यांचा दौरा करत असून संबंधित घटकांकडून माहिती गोळा करत आहे. १२ मार्च रोजी झालेल्या बैठकीनंतर ही तीन दिवसीय बैठक खूप महत्त्वाची मानली जातेय. या बैठकीत संयुक्त सांमजस्य कराराला अंतिम स्वरुप दिले जाऊ शकते.

8th Pay Commission
8th Pay Commission: शिक्षकांची बेसिक सॅलरी १.३४ लाख होणार? आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com