

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट
शिक्षकांचा पगार १,३४,५०० होणार?
शिक्षक संघटनांची मागणी काय?
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती होणार असा प्रश्न विचारला जात आहे. आठवा वेतन आयोग लागू करण्याची प्रोसेस सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार लवकरच वाढणार असल्याचे दिसत आहे. यामध्ये केंद्र सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा समावेश आहे.
दरम्यान, आता शिक्षक असोसिएशनने आठव्या वेतन आयोगात पगारवाढीसंदर्भात मागणी केली आहे. कर्मचारी संघटनांनी सॅलरी, भत्ते आणि रिटायरमेंटबाबत बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, आता एंट्री लेव्हल (लेव्हल ६) शिक्षकांची बेसिक सॅलरी १,३४,५०० करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, लेव्हल १ कर्मचाऱ्यांचा पगार ५०,००० ते ६०,००० करण्याची मागणी करण्यात आली आहे.
फिटमेंट फॅक्टर वाढण्याची मागणी (8th Pay Commission Fitment Factor)
कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. आठव्या वेतन आयोगात पगारवाढ २.५७ वरुन २.६२ ते ३.८३ करण्याचा प्रस्ताव आहे. यानुसार नवीन पगार निश्चित केला जाणार आहे. याचसोबत वार्षिक पगारवाढ ३ टक्क्यांवरुन ६ ते ७ टक्के करण्याची मागणी केली जात आहे.
महागाई भत्ता
कर्मचाऱ्यांची सर्वात महत्त्वाची मागणी आहे की, महागाई भत्ता ५० टक्के होईल तेव्हा तो बेसिक सॅलरीत जोडावा. यामुळे तुमचा पगार वाढणार आहे, याचसोबत रिटायरमेंटनंतरदेखील फायदे मिळणार आहे.
इतर भत्त्यांमध्ये वाढ
शिक्षक संघटनांनी एचआरए १२टक्के, २४ टक्के आणि ३६ टक्के करण्याचा प्रस्ताव दिला आहे. याचसोबत ट्रान्सपोर्ट अलाउंसला बेसिक सॅलरीच्या १२ ते १५ टक्के करण्याची आणि कमीत कमी ९००० रुपये करण्याची मागणी केली आहे. मुलांच्या शिक्षण भत्ता २,८०० वरुन ७००० करण्याची मागणी केली आहे.
डिजिटल अलाउंस आणि सुट्ट्यांची मागणी
कर्मचाऱ्यांनी २००० रुपये डिजिटल अलाउंस देण्याची मागणी केली आहे. याचसोबत सुट्ट्यांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे.१४ कॅज्युअल लिव्ह, ३० अर्जित रजा, २० मेडिकल लीव देण्यात यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.