

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट
सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १ लाख रुपये होणार
फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशनने ठेवला प्रस्ताव
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आता वेतन आयोगासाठी तयार केलेली समिती अॅक्शन मोडवर आली आहे. वेतन आयोगाच्या बैठका सुरु झाल्या आहेत. मागच्या आठवड्यात देहारादून येथे पहिली बैठक झाली होती. आता दिल्लीत कर्मचारी संघटनांसोबत बैठक होणार आहे. दरम्यान,केंद्रीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या सांगितल्या आहेत.यामध्ये फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशनने (FNPO) महत्त्वाची मागणी केली आहे.
काय आहे मागणी?
वेतन आयोगाकडे जी मागणी केली आहे त्याअंतर्गत पोस्टमनची हेसिक सॅलरी १.१२ लाख रुपये आणि फिटमेंट फॅक्टर ३.८३ ठेवावा अशी आह. याचसोबत ग्रामीण डाक सेवकांचादेखील आठव्या वेतन आयोगात समावेश करावा. याचसोबत ६ टक्का वार्षिक पगारवाढ मिळावी, असंही त्यांचे म्हणणे आहे. याचसोबत डाक सहायक, सॉर्टिंग सहायक, मेल गार्ड, नागरी शाखा, प्रशासकीय कार्यालय, लेखा विभाग अशा इतर विभागांसंबंधित मागण्या आहेत.
मूळ पगार किती? (8th Pay Commission Basic Salary Hike)
फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशनने नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ६९००० रुपये वेतनाची मागणी केली आहे. मल्टी टास्किंग स्टाफसाठी हे वेतन प्रस्तावित केले आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८००० रुपये आहे.
पोस्टमन किंवा मेल गार्डसाठी एफएनपीओने २५,५०० वरुन १,१२,००० रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. लेव्हल ५ साठी ही पगारवाढ प्रस्तावित आहे.याचसोबत लेव्हल २ आणि ३, लेव्हल ८,९ आणि १०चे विलीनीकरण करण्याचेही सुचवले आहे.
एफएनपीओने टपाल कर्मचाऱ्यांसाठी ३.८३ चा फिटमेंट फॅक्टर प्रस्तावित केला आहे. सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७ आहे. यानंतर नवीन वेतन आयोगात ३.८३ फिटमेंट फॅक्टर करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.