आधार कार्ड हरवलंय? मग घरबसल्या २ मिनिटांत नवीन आधार करा डाऊनलोड

Manasvi Choudhary

आधारकार्ड

आधारकार्ड हा सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. शाळा- कॉलेज अॅडमिशन ते नवीन फोन खरेदी करण्यापर्यंत अनेक कामांसाठी आधारकार्डची आवश्यकता असते.

Aadhar Card | GOOGLE

आधारकार्ड डाऊनलोड करण्याची सोपी प्रोसेस

मात्र तुमचेही आधारकार्ड जर हरवले असेल किंवा कुठे विसरला असाल तर काय करावे असा प्रश्न तुम्हाला देखील पडतो, यासाठी आज आम्ही तुम्हाला सोपा मार्ग सांगणार आहोत.

Aadhar Card Update | Yandex

डाऊनलोडचा पर्याय

आधारकार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्याचा पर्याय असतो तो तुम्ही निवडू शकता. आधारकार्ड डाऊनलोड करताना अनेकदा अडचणी येतात मात्र तुम्ही या सोप्या स्टेप्सने ऑनलाईन आधारकार्ड डाऊनलोड करू शकता.

Aadhar card Online | Yandex

माहिती अचूक भरा

आधारकार्ड डाऊनलोड न होण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे चुकीची माहिती. अनेकजण घाईगडबडीत चुकीची माहिती अपडेट करतात यामुळे आधारकार्ड डाऊनलोड प्रक्रिया थांबते त्यामुळे माहिती व्यवस्थित भरा.

Aadhar-Card | GOOGLE

नोंदणीकृत मोबाईल नंबर

आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल नंबरवर ओटीपी येतो. यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला असावा. ही प्रोसेस झाली नसेल तर ओटीपी येणार नाही.

Aadhar-Card | GOOGLE

इंटरनेट कनेक्शन

आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेटचे कनेक्शन स्ट्राँग असणे महत्वाचे आहे. इंटरनेट नीट नेसल तर वेबसाइट पूर्णपणे लोड होणार नाही.

Aadhar card Online | Yandex

UIDAI सर्व्हर डाऊन

जेव्हा मोठ्या संख्येने वापरकर्ते एकाचवेळी डाऊन लोड करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी किंवा इतर सेवा वापरण्यासाठी वेबसाईट वापरतात तेव्हा सर्व्हरवर लोड येतो अशावेळी वेबसाइट डाऊन होते.

Aadhar card Online | freepik.com

चुकीचा कॅप्चा

सुरक्षेच्या कारणास्तव, UIDAI वेबसाईटवर कॅप्चा भरणे अनिवार्य आहे. जर तुम्ही कॅप्चा चुकीचा भरला किंवा अक्षरे चुकीची भरली असतील तर तुम्हाला आधारकार्ड डाऊनलोड करण्यासाठी अडथळा येऊ शकतो.

Aadhar Card | GOOGLE

NEXT: पारंपारिक चव आणि आरोग्याचा खजिना असलेली लाल माठाची भाजी तुम्ही कधी खाल्लीये का? गावरान स्टाईल सोपी रेसिपी

Monsoon Special Traditional Recipe
येथे क्लिक करा..