पारंपारिक चव आणि आरोग्याचा खजिना असलेली लाल माठाची भाजी तुम्ही कधी खाल्लीये का? गावरान स्टाईल सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

लाल माठाची भाजी

लाल माठाची भाजी चवदार लागते. आरोग्यासाठी ही भाजी अत्यंत फायदेशीर मानली जाते.

Lal Math Bhaji Recipe | yandex

सोपी रेसिपी

गावरान पद्धतीने तुम्ही घरीच लाल माठाची भाजीची रेसिपी ट्राय करू शकता. लसूण, शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची घालून बनवलेली ही भाजी चवदार लागते.

red amaranth | Saam Tv

साहित्य एकत्र करा

लाल माठाची भाजी बनवण्यासाठी लाल माठ, लसूण, हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट, जिरे, मोहरी, मीठ आणि तेल हे साहित्य एकत्र करा.

Lal Math Bhaji | yandex

भाजी निवडून घ्या

सर्वातआधी लाल माठाची भाजी स्वच्छ निवडून धुवून घ्या.

Lal Math Bhaji | yandex

फोडणी द्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे, मोहरी आणि लसूण याची फोडणी द्या. फोडणी दिल्यानंतर त्यात हिरवी मिरची कापून टाका.

Fodni

लाल माठाची भाजी मिक्स करा

नंतर या मिश्रणात बारीक चिरलेली लाल माठाची भाजी मिक्स करा भाजी चांगली परतून घ्या.

Lal Math Bhaji | yandex

पाणी मिक्स करू नका

भाजीवर झाकण ठेवा आणि वाफेवर शिजवा. भाजीमध्ये पाणी मिक्स करू नका.

Lal Math Bhaji Recipe | yandex

चवीनुसार मीठ मिक्स करा

भाजी शिजली की त्यात चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कूट मिक्स करा.

salt | yandex

लाल माठाच्या भाजीचे फायदे

लाल माठाच्या पानांमध्ये आयर्न आणि फॉलिक अ‍ॅसिड असते. ज्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

Lal Math Bhaji | yandex

या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने बद्धकोष्ठता, गॅस, आम्ल यासांरख्या समस्या दूर होण्यासाठी फायदा होतो.

या भाजीमधील व्हिटॅमिन ए आणि अँटिऑक्सिडंट्समुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी मदत होते. त्वचेसाठी देखील ही भाजी फायदेशीर आहे.

Lal Math Bhaji | yandex

NEXT: पाण्याचा एक थेंबही न घालता बनवा कुरकुरीत 'खेकडा भजी', चव एवढी भारी की न खाणारेही खातील

Khekda Bhaji Recipe
येथे क्लिक करा...